शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्रिय बॅडमिंटन अकादमीसाठी सहकार्य करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:27 IST

बॅडमिंटन अकादमीचे पश्चिम क्षेत्रिय केंद्र नागपुरात सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.

ठळक मुद्देनितीन गडकरी: माजी खेळाडू सी.डी. देवरस, प्रदीप गंधे सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॅडमिंटन अकादमीचे पश्चिम क्षेत्रिय केंद्र नागपुरात सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक विजेत्यांना पुरस्कार वितरित केल्यानंतर गडकरी यांनी खेळांच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, महाराष्ट्रÑ बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी प्रास्तविकात क्षेत्रिय केंद्र नागपुरात सुरू करण्यास एमबीए उत्सुक असून जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महाराष्टÑ शासनाकडे दिल्याचे सांगून राज्य शासनाने सहकार्य करण्याची विनंती केली होती. गडकरी यांनी शासनाकडून कुठलेही सहकार्य कमी पडणार नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी आमदारद्वय डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, आशिष देशमुख आणि डॉ. परिणय फुके यांच्यासह महापौर नंदा जिचकार, महामेट्रोचे सीएमडी बृजेश दीक्षित, एनडीबीए अध्यक्ष कुंदाताई विजयकर, सचिव मंगेश काशीकर, परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्यासह बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडिया आणि एमबीएचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘रौद्र बँड’ पथकाच्या सादरीकरणानंतर स्पर्धेचे ‘थिमसॉंग’ वाजविण्यात आले.गडकरी यांच्याहस्ते ज्येष्ठ बॅडमिंटनपटू सी. डी. देवरस आणि प्रदीप गंधे यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह तसेच एक लाख रुपये रोख देऊन आयोजन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. सर्व पाहुण्यांना लखानी यांनी सन्मानचिन्हे प्रदान केली. ़सांघिक स्पर्धेतील विजेता संघ पेट्रोलियन क्रीडा संवर्धन बोर्ड (पीएसपीबी) संघाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात आला. उपविजेता मध्य प्रदेश संघ दोन लाख रुपयांचा मानकरी ठरला. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी एक लाख २० हजार रुपये पुरस्कार मिळाला. याशिवाय उपांत्यपूर्व फेरीत पराभूत चार संघांना प्रत्येकी ६० हजार रुपये देण्यात आल्याची माहिती लखानी यांनी दिली.