शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

By admin | Updated: December 30, 2016 02:38 IST

आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का?

चर्चासत्र : शोभाताई फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का? त्याला सन्मान देतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. दरवर्षी बजेटमध्ये कृषीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते, परंतु ती कधीच खर्च होत नाही. शासनाच्या विविध योजना आहेत, मात्र त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याला विकासाचा केंद्रबिंदू मानल्या जात नाही, तोपर्यंत शेतकरी हा सुखी होणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केले. भारताचे पहिले कृषिमंत्री तथा शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११८ व्या जयंती सप्ताहनिमित्त कृषी महाविद्यालय, नागपूर, अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजि. मित्र परिवारातर्फे ‘आगामी अंदाजपत्रकात कृषी, ग्रामीण व्यवस्था व कृषीवर आधारित उद्योगाकरिता तरतूद’ या विषयावर गुरुवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, आयडीबीआय बँकेचे माजी संचालक अर्जुन घुगल, नारायण होले पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एन. डी. पार्लावार व संजय वाघमारे उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाल्या, निसर्गाने विदर्भाला खूप काही दिले आहे. येथे वर्धा, वैनगंगा व पैनगंगा सारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. मात्र असे असताना येथील केवळ १३ टक्केच क्षेत्र ओलिताखाली आहे. शिवाय उर्वरित ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. विदर्भातील नद्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे येथे धरणे आणि तलाव बांधणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र ‘जलयुक्त शिवार’ च्या माध्यमातून आता तो प्रयोग सुरू झाला आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि माफक दरात खते उपलब्ध झाले पाहिजे. असेही त्या म्हणाल्या. आज स्पर्धेच्या युगात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशीही त्यांनी यावेळी मागणी केली. कार्यक्रमाला शरद चांडक, प्रणय पराते, दिलीप मोहितकर व अजय तायवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद राऊत यांनी केले. प्रणय पराते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला ‘दमनी’ भेट अ‍ॅग्रोव्हेट संस्थेतर्फे महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला एक ‘दमनी’ भेट देण्यात आली आहे. या ‘दमनी’चे गुरुवारी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, एन. डी. पार्लावार, प्रणय पराते, दिलीप मोहितकर, अजय तायवाडे, नारायण होले पाटील व व्ही. एस. टेकाडे उपस्थित होते. ती ‘दमनी’ मध्य प्रदेशातील बालाघाट येथून आणण्यात आली असून, ती ८० वर्षे जुनी आहे. त्या आकर्षण ‘दमनी’ला डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाशेजारी ठेवण्यात आले आहे.