शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दिशाच्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:03 IST

हैदराबादमधील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची मागणी : संविधान चौकात आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हैदराबादमधील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.हैदराबाद येथील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर असामाजिक तत्त्वांनी अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत असताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने संविधान चौकात गोळा झाले. त्यांनी मेणबत्त्या पेटवून डॉ. दिशा हिला आदरांजली वाहिली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या, ‘जय श्रीराम’, ‘देश का बल बजरंग दल’, ‘नारीयों के सन्मान मे बजरंग दल मैदान मे’ आदी घोषणा देऊन या घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी बोलताना प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी पाश्चात्य संस्कृतीपासून दूर राहण्याची गरज असल्याचे सांगून, महिलांच्या सन्मानासाठी युद्ध झालेल्या देशात महिलांवर अत्याचार होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. आंदोलनात महानगर मंत्री प्रशांत तितरे, महानगर उपाध्यक्ष अमित बेंबी, बजरंग दलाचे सहसंयोजक विशाल पुंज, लखन कुरील, ऋषभ अरखेल, प्रजापती रंगलाल, सोनू ठाकूर, शुभम अरखेल, बिट्टू सावरिया, सूरज दुबे, सौरभ शाहू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनRapeबलात्कारMurderखून