शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

विदर्भात तुरीचे उत्पादन कमी, कृत्रिम भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 10:56 IST

गेल्यावर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी तर केलीच पण पोषक हवामानाअभावी तुरीचा उतारासुद्धा कमी येण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसानंतर खरे भाव कळणारअधिकाऱ्यांनी कारवाई करावी

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्यावर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी तर केलीच पण पोषक हवामानाअभावी तुरीचा उतारासुद्धा कमी येण्याचा अंदाज आहे. नवीन तूर १५ दिवसानंतर बाजारात येणार आहे. व्यापाऱ्यांनी ही बाब हेरून १० दिवसांपासून स्वत:जवळील तूर डाळीचा जुना साठा बाजारात आणून कृत्रिम भाववाढ सुरू केली आहे. भाववाढीवर आतापासूनच अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली.१५ दिवसापूर्वी किरकोळ बाजारात ७० ते ७५ रुपयांला विकण्यात येणाऱ्या तूर डाळीचे भाव सध्या ८० ते ८५ रुपयांवर पोहोचले आहेत. यंदा तूर डाळीचे उत्पादन कमी होण्याचे मौखिक वृत्त पसरवून व्यापारी स्वत:ची पोळी शेकून संघटितरीत्या दरदिवशी भाव वाढवित आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांना नवीन तुरीला ४५०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त किमतीत तूर डाळ खरेदी करावी लागत आहे. आतापासून व्यापाऱ्यांवर लगाम न लावल्यास व्यापारी संघटितरीत्या आणखी भाव वाढवतील आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या नाकीनऊ येईल, अशी शक्यता अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ संघटन मंत्री गजानन पांडे यांनी व्यक्त केली.अडीच ते तीन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांनी मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याचे सांगून तूर डाळीचे भाव कृत्रिमरित्या प्रति किलो १८० रुपयांपर्यंत नेले होते. त्यामुळे तूर डाळ गरीब आणि सामान्यांच्या ताटातून गायब झाली होती. यावर सरकारने तात्काळ निर्णय घेत विदेशातून डाळ मागविली होती. शिवाय कमी भावात रेशन दुकानांमध्ये विकली होती. शेतकऱ्यांनीही दुसऱ्या हंगामात विक्रमी लागवड करून पीक घेतले होते. परिणामी दोन हंगामात तूर डाळीचे भाव प्रचंड प्रमाणात खाली आले होते.गेल्यावर्षीच्या हंगामात तूर प्रति क्विंटल ३२०० ते ३४०० रुपये आणि तूर डाळीला ठोक बाजारात गुणवत्तेनुसार ५० ते ५५ रुपये भाव होते. किरकोळ दुकानांमध्ये चांगल्या प्रतीची डाळ ६० ते ६५ रुपयांत अनेक महिने उपलब्ध होती. स्वताईनंतरही उठाव कमी होता. त्यामुळे अनेक दालमिल बंद झाल्या होत्या. त्याप्रमाणे विक्रमी उत्पादनामुळे सर्वच डाळींचे भाव अर्ध्यापेक्षा कमी किमतीवर आले होते. पण व्यापारी पुन्हा एकदा संधी साधून तूर डाळीच्या किमती कृत्रिमरीत्या वाढवित आहे. त्याचा फटका केवळ ग्राहकांना बसत आहे.आयात सुरू करावीशेतकऱ्यांच्या पिकाला चांगले भाव मिळावेत म्हणून केंद्र सरकारने तूर आणि डाळीच्या आयातीवर निर्बंध लावले आणि अन्य डाळींवर आयात शुल्क वाढविले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला चांगले भाव मिळेल, ही सरकारची अपेक्षा फोल ठरली. शेतकऱ्यांना तुरीला भाव मिळालाच नाही. शिवाय बाजारात डाळीला उठावही नव्हता. यंदाच्या हंगामात तूर पूर्णपणे बाजारात आली नाहीच, त्यानंतरही व्यापारी १५ दिवसांपासून तूर डाळीचे भाव वाढवित आहेत. व्यापारी या महिन्यात तूरडाळीचे भाव प्रति किलो १०० रुपयांवर नेण्याच्या तयारीत आहेत. भाव वाढवून व्यापारी नफा कमवित आहेत. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आतापासून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पांडे यांनी केली.

भाववाढीचे विरोधकांना मिळणार हत्यारतूरडाळ सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कांद्याच्या भाववाढीने दिल्लीतील भाजपा सरकारला सत्तेतून जावे लागले होते. अडीच ते तीन वर्षांपूर्वी तूरडाळीच्या किमती १८० रुपयांवर गेल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांनी संघटितपणे तूरडाळीच्या किमती पूर्वीप्रमाणे १५० रुपयांवर नेल्यास सरकारला आयातीला वेळ मिळणार नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळवून देण्याच्या नादात सरकारला पुढे तूरडाळीच्या किमतीत नियंत्रण मिळविणे कठीण होईल आणि भाववाढीचे विरोधकांना आयतेच हत्यार मिळेल, अशी शक्यता पांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :agricultureशेती