शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नागपुरातील अंबाझरी उद्यानात बिबट्याचे पगमार्क आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:22 IST

मागील तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या शहरालगतच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात गुरुवारी सकाळी बिबटसदृश प्राण्याचे पगमार्क आढळले आहेत.

ठळक मुद्देसुरक्षेसाठी तीन दिवस नागरिकांना प्रवेशबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या शहरालगतच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात गुरुवारी सकाळी बिबटसदृश प्राण्याचे पगमार्क आढळले आहेत. अगदी शहराच्या जवळ असलेल्या या उद्यानात प्रथमच बिबटसारख्या प्राण्याचा वावर असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने हे उद्यान पुढील तीन दिवस नागरिकांसाठी बंद ठेवले आहे.शहराच्या पश्चिमेला असलेल्या या उद्यानामध्ये नागरिक दररोज सकाळी, सायंकाळी फिरायला जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी नागरिक फिरायला गेले असता काही जागृत नागरिकांना सकाळी ६.३० वाजता पाणवठ्याच्या परिसरात बिबटसारख्या प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच उद्यानात बिबट असल्याची एकच वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे फिरायला आलेल्या नागरिकांनी येथून काढता पाय घेतला.वनविभागाला ही माहिती कळताच हिंगणा वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन आधी नागरिकांचा प्रवेश थांबविला. तज्ज्ञांनी हे पगमार्क तपासले असता बिबट्याचे असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. ही खात्री होताच वनविभागाने दोन चमू तयार करून परिसरामध्ये शोधमोहिम राबविली. मात्र दाट झाडीझुडपामध्ये त्याचा शोध लागू शकला नाही.१ डिसेंबरपर्यंत पार्क बंदसुरक्षेचा उपाय म्हणून १ डिसेंबरपर्यंत पार्क नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी दुपारी घेण्यात आला. प्राण्याचे ठसे नेमके बिबट्याचेच आहेत काय, त्याचे वय आणि वजनही त्याच्या ठशावरून निश्चित करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक आणि तज्ज्ञांकडून अभ्यास केला जात आहे. त्याच्यावरील निगराणीसाठी परिसरात ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत. वन कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून रोज शोधमोहिम राबविली जाणार असून शहानिशा झाल्यावर हे पार्क सुरू केले जाईल, अशी माहिती नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे.मिहान परिसरातील वाघ दोनदाच कॅमेऱ्यातमिहान परिसरातील इन्फोसिस कंपनीच्या परिसरात आढळलेला वाघ २७ नोव्हेंबरला कॅमेऱ्यामध्ये दिसून आला होता. त्यापूर्वीही चार दिवसांपूर्वी तो एकदा दिसला होता. त्यानंतर पुन्हा तो कॅमेऱ्यात आला नसला तरी त्याची दहशत कायमच आहे. कंपनीमध्ये कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही भीती कायम आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी वनविभाच्या अधिकाऱ्यांनी इन्फोसिस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परिसरात असलेला कचरा आणि लहान झुडपे तोडून साफ करण्याच्या सूचना दिल्या. परिसरात अद्यापही सुमारे ३० च्या जवळपास ट्रॅप कॅमेरे लागलेले आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याAmbazari Lakeअंबाझरी तलाव