शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवकांनाच का देता विधान परिषदेचे सदस्यत्व

By admin | Updated: March 19, 2015 02:36 IST

विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी प्रामुख्याने समाजसेवकांचाच विचार केला जात असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

नागपूर : विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी प्रामुख्याने समाजसेवकांचाच विचार केला जात असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शासनाला फटकारून अन्य क्षेत्रातील व्यक्तींनाही योग्य संख्येत संधी देण्याची सूचना केली.राज्यघटनेच्या अनुच्छेद १७१ मधील कलम ५ अनुसार साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ व सामाजिक कार्य या क्षेत्रातील अनुभवी व ज्ञानी व्यक्तींना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले जाते. यापैकी सामाजिक कार्य क्षेत्रातील व्यक्तींना जास्तीतजास्त संधी मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. केवळ सामाजिक कार्यातच पात्र व्यक्ती आहेत व अन्य क्षेत्रात नाहीत असे म्हणता येणार नाही. विविध क्षेत्रातील व्यक्तींना विधान परिषद सदस्यत्व देण्याची तरतूद करण्यामागे निश्चितच व्यापक विचार असावा. त्याशिवाय अशी तरतूद करण्यात आली नसती, असे मत न्यायालयाने व्यक्त करून यासंदर्भात शासनाला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. यासंदर्भात साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी व माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. आजपर्यंत सामाजिक कार्य व सहकार चळवळीतील व्यक्तींनाच जास्त संधी मिळाली आहे. विज्ञान व कला क्षेत्रावर सतत अन्याय करण्यात येतो. यामुळे सर्वांचे नामनिर्देशन रद्द करून सर्व क्षेत्रातील व्यक्तींना समान प्रतिनिधित्व द्यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या जूनमध्ये प्रा. जनार्दन चांदूरकर, आनंद गाडगीळ (साहित्य), हुसनाबानो खालिफ, रामहरी रुपनवार, रामराव वाडकुटे, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये (सर्व सामाजिक कार्य), आनंद पाटील, राहुल नार्वेकर (सहकार चळवळ) व विद्या चव्हाण (कला) या १२ सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वासाठी नामनिर्देशित करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. भारती दाभाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)