शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘एलईडी’ पथदिव्यांचा कधी पडणार उजेड ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 10:06 IST

मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०१८ पर्यत २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची शहरातील नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

ठळक मुद्देचार वर्षांत लागले २३ हजार पथदिवेअद्यापही काम संथच

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचा विचार करता महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात १८ महिन्यात २७ हजारांचे उद्दिष्ट असताना जेमतेम ५३७ पथदिवे बदलविले. त्यामुळे जे.के. सोल्युशन इंक कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नव्याने या कामाला सुरुवात करण्यात आली. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०१८ पर्यत २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची शहरातील नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे.महापालिकेला दरवर्षी पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. यावर ५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र आर्थिक टंचाईमुळे प्रकल्पाचे काम संथ आहे. पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या भागात एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर शहरातील रस्त्यांवरील विद्यमान पथदिवे बदलवून त्याठिकाणी एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांत प्रकल्पावरील खर्च निघून ३५० कोटींची बचत होईल असा दावा पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

झोन निहाय कंत्राट तरीही विलंब२०१४ मध्ये जे.के. सोल्युशन इंक कंपनीला निर्धारित कालावधीत एलईडी दिवे बसविण्यात अपयश आल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. या कंपनीचा अनुभव विचारात घेता झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले.२६ हजार एलईडी आले, २३ हजार लागलेशहराच्या विविध भागात लावण्यासाठी २६ हजार एलईडी प्राप्त झाले आहे. यातील २३ हजार लावण्यात आले. ३ हजार एलईडी लावण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. पथदिवे लावण्याच्या कामाची गती वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.एस.बी. जयस्वाल, कार्यकारी अभियंता विद्युत

फायद्याचा प्रकल्प असूनही विलंबया प्रकल्पामुळे पथदिव्यांची जागा एलईडी दिवे घेणार असल्याने देखभाल व दुरुस्तीच्या खर्चाच्या खर्चात मोठी कपात अपेक्षित आहे. तसेच ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार असल्याने ९९ महिन्यात एलईडी दिवे लावल्यानंतर पुढील ९ वर्षात प्रकल्पावरील संपूर्ण खर्चाची परतफेड होऊन ३५० कोटींची बचत होणार आहे. असे असूनही प्रकल्पाला विलंब का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका