शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती चौकातील एलईडी साईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

- महामेट्रोचा महसूल वाढीचा प्रयत्न : वाहनचालकांचे लक्ष होतेय विचलित राहुल लखपती नागपूर : महसूल वाढीसाठी महामेट्रोने छत्रपती चौकात ...

- महामेट्रोचा महसूल वाढीचा प्रयत्न : वाहनचालकांचे लक्ष होतेय विचलित

राहुल लखपती

नागपूर : महसूल वाढीसाठी महामेट्रोने छत्रपती चौकात लावलेल्या एलईडी साईन बोर्डमुळे अपघात होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहरातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारे आणि स्मार्ट सिटी मिशनमधील मुख्य घटकांपैकी एक असलेल्या महा मेट्रोने ‘नॉन-बॉक्स भाडे महसूल’ (प्रवासी नसलेला महसूल) वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. महामेट्रोला प्रवाशांच्या माध्यमातून पुरेसा महसूल अजूनही मिळत नाही. महसूल मिळविण्यासाठी महामेट्रोने छत्रपती चौकात एक एलईडी वॉल (डिजिटल अ‍ॅडव्हर्टायजमेंट माध्यम) बसविले असून महामेट्रोच्या वेळेची माहिती तसेच जनतेसाठी वेळोवेळी सर्वसाधारण व वैधानिक माहिती प्रसारित करण्यात येते. चौकात लावलेला एलईडी साईन बोर्ड फारच मोठा असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा आहे. या चौकात अनेक अपघात होत असल्याने जुना छत्रपती चौक उड्डाणपूल केवळ त्या उद्देशाने बांधण्यात आला होता. जुना उड्डाणपूल भारताच्या पहिल्या बहुस्तरीय वाहतूक व्यवस्थेसाठी मार्ग काढण्यासाठी पाडण्यात आला.

या संदर्भात माहिती घेण्यासाठी लोकमतने मनपाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, उड्डाणपूल व रस्ता महामेट्रो अंतर्गत आहे. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. या ठिकाणी महामेट्रोने एलईडी वॉल बसविल्याची माहिती आहे. स्क्रिनचा समोरील भाग मनपाच्या कोणत्याही रस्त्यासमोर येत असेल तर मनपाला न्यायालयाने निश्चित केल्यानुसार परवाना शुल्क भरावे लागेल.

एलईडी होर्डिंग संदर्भात महामेट्रोचे अधिकारी म्हणाले, नियमांचे पालन करून चौकात लावण्यात आलेले डिजिटल होर्डिंग अनिवार्य उंचीवर लावले आहे. त्यामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होत नाही. कायदा असा म्हणतो की, सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही जाहिरात २.४ मीटर उंच असली पाहिजे. महामेट्रोने नॉन प्रवासी महसूल मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. महसूल प्राप्त करण्यासाठी हा एक मार्ग आहे. सध्या एलईडी वॉलवर कोणत्याही जाहिराती चालवल्या जात नाहीत, परंतु भविष्यात आम्ही व्यावसायिक जाहिराती घेणार आहोत.

खासदार रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते म्हणाले, महामेट्रोने छत्रपती चौकात डिजिटल होर्डिंग लावल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या ते योग्य असेल, परंतु स्क्रिन नक्कीच लक्ष वेधून घेईल आणि लोकांची एकाग्रता कमी होण्याची शक्यता आहे. वापरलेली एलईडी खूपच चमकदार असून ती मंद असायला हवी. त्यामुळे वाहनचालकाला स्क्रिन पाहण्यास भाग पाडणार नाही. शहराच्या सुशोभिकरणासाठी हे चांगले आहे, परंतु यामुळे मानवी जीव किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये.