शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

लाव्हात हल्लेखोरांचा हैदोस

By admin | Updated: June 5, 2016 02:41 IST

डीजे बंद करण्याची सूचना केली म्हणून संतप्त जमावाने एका अपार्टमेंटवर जोरदार हल्ला चढवला.

डीजे बंद करायला सांगितला म्हणून वाद : विटा, खुर्चीने मारहाण नागपूर : डीजे बंद करण्याची सूचना केली म्हणून संतप्त जमावाने एका अपार्टमेंटवर जोरदार हल्ला चढवला. हल्लेखोरांनी दगड, विटा, खुर्च्यांनी केलेल्या मारहाणीत दोघांना जबर दुखापत झाली असून, लाव्हा (वाडी) परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता. लाव्हा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दादाराव डोईफोडे यांच्या मुलीच्या जन्मदिवसानिमित्त तिरुपती बालाजी मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे डीजेही लावण्यात आला होता. उशिरा रात्रीपर्यंत डीजे वाजत असल्याने शेजाऱ्यांना त्रास होत होता. त्यामुळे श्री साई सृष्टी अपार्टमेंटमदील दोन तरुण कार्यक्रमस्थळी गेले आणि त्यांनी डीजे बंद करण्याची सूचना केली. त्याला दाद न देता कार्यक्रमातील काही जणांनी या दोघांना मारहाण केली. त्यामुळे हे दोघे आपल्या सहनिवासात पळून आले. पाठोपाठ २० ते २५ जणांचा जमाव आरडाओरड करीत सोसायटीत शिरला. सिक्युरिटी गार्डला मारहाण करीत आरोपींनी विटा,खुर्च्या फेकून मारत सोसायटीत हैदोस घातला. त्यामुळे पलाश सोनी (वय २२) आणि दिलीप शेंडे (वय ४०) गंभीर जखमी झाले. या सर्वांना ग्रामसेवक चिथावणी देत होता. या घटनेने संतप्त झालेल्या सोसायटीतील नागरिकांनी हल्लेखोरांकडे धाव घेताच ते पळून गेले. जबर जखमी झालेल्या सोनी यांना मेयोत तर शेंडेंना वाडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, दारूच्या नशेत हैदोस घालणाऱ्या हल्लेखोरांना शेंडे समजावत होते. हल्लेखोरांनी त्यांनाच विटा-दगडांनी बेशुद्ध होईपर्यंत मारले.दरम्यान, प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर वाडी पोलिसांनी आरोपी अमोल सुधाकर डोईफोडे (वय २१), राजन ऊर्फ मुन्ना देवीदास थूल (वय ३२), सचिन जोगीनाथ नितनवरे (वय २८), उमेश वामनराव ठाकरे (वय १९) आणि युवराज भगवानजी उकडे (वय २८) यांना अटक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)