शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीतूनच घडले नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:09 IST

जितेंद्र ढवळे नागपूर : जिल्ह्यात १३० ग्राम पंचायतीची रणधुमाळी सुरु झाली आहे. १८ जानेवारी रोजी पुढील पाच वर्षासाठी गाव ...

जितेंद्र ढवळे

नागपूर : जिल्ह्यात १३० ग्राम पंचायतीची रणधुमाळी सुरु झाली आहे. १८ जानेवारी रोजी पुढील पाच वर्षासाठी गाव कारभारी ठरतील. पंचायत राज व्यवस्थेत ग्रा.पं.ला विशेष महत्त्व आहे. गावातूनच राज्य आणि देशपातळीवरील नेतृत्वाची जडणघडण झाल्याची अनेक उदाहरणे आहे. नागपूर जिल्ह्यातही ग्रा.प.सदस्य आणि सरपंचपदाचा मान भूषविणाऱ्यांनी राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात छाप सोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची जडघडण झाली आहे. यात माजी मंत्री रणजित देशमुख, दिवंगत आ.सुनील शिंदे, दिवंगत आमदार आ. ला.वाघमारे, माजी आ. मुकुंदराव मानकर, माजी जि.प.अध्यक्ष रमेश मानकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. यासोबतच कामठी तालुक्यातील टेमसना येथील शेतकरी कुटुंबातील पुरुषोत्तम पंजाबराव शहाणे (पाटील)१९९५ मध्ये टेमसना ग्रा.पं.चे सरपंच झाले. यानंतर ते १९९८ मध्ये भूगाव पंचायत समिती गणातून विजयी झाले. यानंतर कामठी पंचायत समितीचे सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. २००० मध्ये वडोदा जि.प. सर्कल मधून विजयी झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होण्याची संधी त्यांना लाभली. ग्राम विकासात शहाणे यांचे योगदान मोठे आहे. तालुक्यातील आसोली येथील अनिल निधान २००५ मध्ये महालगाव आसोली गट ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर २००५ मध्ये आजनी गुमथळा जि.प. सर्कल म्हणून ते विजयी झाले. २०२० च्या जि.प.निवडणूक गुमथळा सर्कलमधून विजयी झालेले निधान सध्या जि.प.चे विरोधी पक्ष नेते आहेत.

अलीकडेच्या काळात कळमेश्वर तालुक्यातील सुसुंद्री या छोट्याशा गावात जन्मलेले श्रावण भिंगारे हे २००८ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. तत्कालीन सरपंच नरेंद्र डोंगरे यांच्या अकाली निधनानंतर श्रावण भिंगारे यांच्याकडे सरपंचपदाची जबाबदारी आली. सध्या भिंगारे पंचायत समितीचे सभापती आहेत. तसेच उबाळी येथील नरेंद्र पालटकर यांनी २००२ ते २०११ पर्यंत सलग ९ वर्ष ग्राम पंचायतीचे सरपंचपद भूषविले. पंचायत समितीच्या उबाळी गणातून ते निवडून येत २०१२ ते २०१९ हा साडेसात वर्षे ते पं.स.चे उपसभापती राहिले आहे.

भिवापूरच्या सरपंच ते पंचायत समितीच्या सभापती या दोन्ही पदी आरूढ होत शहर व तालुक्याची सूत्रे कुंदा कंगाले यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. भिवापूरला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यापूर्वी भिवापूर जिल्ह्यातील मोठ्या ग्रा.पं.पैकी एक होती. २००७ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कुंदा कंगाले यांना सरपंच पदाचा मान मिळाला. २००७ ते २०१२ पर्यंत त्या भिवापूरच्या सरपंच होत्या. त्यानंतर सन २०१२ मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत त्या भिवापूर गणातून विजयी झाल्या. २०१५ पर्यंत त्या भिवापूरच्या सभापती होत्या. मात्र तत्पूर्वीच २०१४ मध्ये भिवापूरला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. त्यामुळे पंचायत समितीचा भिवापूर गण रद्द झाला. सरपंच ते सभापती असा ८ वर्षाचा राजकीय प्रवास कंगाले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला.

ग्रा.पं.सदस्य ते राज्यात मंत्री

रणजित देशमुख

ग्रा.पं.सदस्य ते राज्यात मंत्रिपद भूषविणारे रणजित देशमुख यांचा राजकीय प्रवास नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथून सुरु झाला. ते १९७२ मध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्यामधून पंचायत समिती सभापती निवडण्याची मुभा होती. १९७२-७७ या काळात ते नरखेड पंचायत समिती सभापती होते. १९७९ मध्ये जि.प.च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ते जि.प.अध्यक्ष झाले. यानंतर १९८५-९५ या काळात ते सावनेर विधानसभा मतदार संघातून सदस्य होते. यादरम्यान १९८८ गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास विभागाचे राज्यमंत्री, १९९० जलसंधारण, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा , वित्त व नियोजन राज्यमंत्री होते. १९९३ ला राज्याचे ग्रामविकास, रोजगार हमी व जलस्रोत मंत्री होते. १९९८ विधान परिषद सदस्य व १९९९ ला कृषी व वस्त्रोद्योग मंत्री होते. ग्रामपंचायत पासून मिळालेल्या अनुभवामुळे त्यांचा प्रशासनावर वचक होता.

ग्रा.पं. सदस्य ते आमदार

सुनील शिंदे

सावरगाव येथे जन्मलेले दिवगंत माजी आमदार सुनील शिंदे यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायत सदस्य ते विधानसभा सदस्य असा राहिला आहे. ते १९६७-७० या काळात ग्रा.पं.सदस्य होते. १९७२-८३ या काळात जि.प.सदस्य, १९८० ते ८३ जि.प.सभापती, १९८५ ते ९५ विधानसभा सदस्य, १९८७ मध्ये रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. ग्राम विकासावर पकड असलेल्या शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात शेतकरी नेते म्हणून स्वतंत्र निर्माण ओळख केली होती.

नवेगावचे पहिले सरपंच झालेत आमदार

आ.ला.वाघमारे

नवेगाव साधू ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच ते उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार असा बहुमान कर्मवीर आ. ला. वाघमारे यांना जातो. सरपंच, आमदार आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असा वाघमारे यांच राजकीय प्रवास राहीला आहे. १५ डिसेंबर १९२१ ला आ. ला. वाघमारे यांचा जन्म उमरेड येथे झाला. १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेणारे वाघमारे यांनी इयत्ता दहावीपासून शाळा सोडली. उमरेड जनपदचे अध्यक्ष, उमरेड तालुका हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष, भारत सेवक संघाचे संयोजक, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव, भारत सरकारच्या मेंढी विकास परिषदेवर नियुक्ती आदी विविधांगी जबाबदाºया त्यांनी यथोचित सांभाळल्या. सन १९६२ ते १९६७ च्या कार्यकाळात नवेगाव साधू ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. १९७२ ते १९७७ या काळात ते उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणूनही ते निवडून आले. मंडल आयोग व सामाजिक परिवर्तनसाठी सुद्धा त्यांचा लढा लक्षवेधी होता. १९७९ ते ८९ ते जि.प.सदस्यही होते. १९७२ दरम्यानच्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करताना त्यांनी उमरेड क्षेत्रात सिंचनासाठी भरीव योगदान दिले.

सरपंच ते आमदार,

मुकुंदराव मानकर

ग्रा.पं. सरपंच ते आमदारकीय पर्यंतचा टप्पा गाठणाऱ्यात काटोलचे माजी आमदार मुकुंदराव गोविंदराव मानकर हेही महत्वाचे नेते आहेत. तालुक्यातील दिग्रस भाऊसाहेब येथून १९६८ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. आधी सरपंच नंतर पंचायत समिती स्वीकृत सदस्य आणि १९७८ मध्ये आमदार असा मानकर यांचा प्रवास राहीला आहे. ८१ वर्षीय मुकुंदराव यांना आजही ग्रामविकासाची आपुलकी आहे.

सरपंच ते जि.प.अध्यक्ष

रमेश मानकर

कळमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र धापेवाडा येथील रमेश मानकर यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायतीमधूनच घडली. १९८४ ते १९९३ या काळात ते धापेवाडा ग्रा.पं.चे सरपंच होते. १९९२ मध्ये ते पहिल्यांदा जि.प. सदस्य झाले. १९९९ मध्ये जि. प.निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवित विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी निवडणुका भाजपच्या उमेदवारीवर लढविल्या. १९९९ मध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद व २००७ मधे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मानकर यांनी भूषविले आहे.

-

गावाचा सरपंच ते राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री म्हणून आजही दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव गौरवाने घेतले जाते. ग्राम पंचायत नेतृत्वाच्या जडघडणीची विद्यामंदिर आहे. गावाच्या विकासासाठी झटणाऱ्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेतृत्व केल्याची अनेक उदाहरणे आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ग्राम स्वराजाची संकल्पना पूर्णपणे वास्तवात साकारण्यासाठी आजवरच्या सर्वच सरकारने प्रयत्न केले आहेत. हे कार्य पुढेही सुरु राहणे आवश्यक आहे. यासोबतच ग्रा.पं.सदस्य, सरपंचांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारने विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चंद्रपाल चौकसे

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटना