शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

‘अँट्रॉसिटी’ हा समतेचा कायदा

By admin | Updated: June 2, 2014 02:17 IST

अँट्रॉसिटी‘ हा बदला घेणारा कायदा म्हणून बदनाम करण्यात आला आहे.

नागपूर : अँट्रॉसिटी‘ हा बदला घेणारा कायदा म्हणून बदनाम करण्यात आला आहे. मुळात हा कायदा ना अधिकार्‍यांनी समजून घेतला ना लोकप्रतिनिधींनी. त्यामुळेच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. परिणामी पीडितांना न्याय मिळू शकला नाही. अँट्रॉसिटी हा मुळात समता प्रस्थापित करणारा कायदा असून त्याची जनजागृती करून हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणला जावा, अशी मागणीर अँट्रोसिटीवर आयोजित चर्चासत्रात वक्त्यांनी एकमुखाने केली.

संविधान फाऊंडेशन आणि महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमतर्फे विंदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात ‘अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे रोहयो व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी सनदी अधिकारी डॉ. मुन्शीलाल गौतम, अँड. प्रदीप वाठोडे, सेवानवृत्त पोलीस अधिकारी टी.बी. देवतळे प्रमुख वक्ते होते.

नितीन राऊत यांनी सुरुवातीलाच राज्यात अन्याय अत्याचाराच्या घटना होत असल्याचे मान्य केले. परंतु त्याचबरोबर शासनाचा तसेच दलितांचा प्रतिनिधी म्हणून सरकारतर्फे वेळीच दखल घेतली गेली. शासनाचा प्रतिनिधी असलो तरी स्वपक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंंत दलित अत्याचाराचे संवेदनशील वास्तव उभे करण्याची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. अँट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी सामाजिक न्याय ही नोडल एजन्सी आणि नोडल अधिकारी नसल्यामुळेही योग्य दखल घेतली जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. टी.बी. देवतळे म्हणाले अँट्रॉसिटी कायदा म्हटला की पोलिसांच्या कपाळावर आट्या पडतात. कायद्याने अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. अँट्रॉसिटीच्या तपास करण्यासाठी स्वतंत्र विभाग करावा, अशी सूचनाही मांडला. अँड. प्रदीप वाठोडे यांनी तंटामुक्तीऐवजी जाती मुक्ती समिती तयार करावी, अशी सूचना अँड. वाठोडे यांनी मांडली.

माजी सनदी अधिकारी डॉ. मुन्शीलाल गौतम यांनी सामाजिक अभिसरणाचे तत्त्व सांगणारा अँट्रॉसिटी कायदा असल्याचे सांगितले. सामाजिक न्यायाच्या योजना आणि अँट्रॉसिटी विषयाची माहिती रे माजी सनदी अधिकारी ई.झेड खोब्रागडे यांनी पॉवर प्रेझेंटेशनद्वारा विषद केली. शिवदास वासे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचन केले. प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)