शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट माफियांकडून कायद्याची पायमल्ली

By admin | Updated: October 2, 2015 07:33 IST

पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती

नागपूर : पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जाधव चौकात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात असल्याची तक्रार पीडित नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी गुरुवारी गृह विभाग सचिवांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.न्यायालयाने पीडित नागरिकांच्या पत्राची जनहित याचिका म्हणून दखल घेऊन अ‍ॅड. हरनीश गढिया यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. अ‍ॅड. गढिया यांनी नियमानुसार याचिका दाखल केली आहे. याचिकेतील अन्य प्रतिवादींमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. जाधव चौकात काही गुंडांनी धाक निर्माण केला आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांची ताकद प्रचंड वाढली आहे. या परिसरातून जाणाऱ्या महिला व तरुणींची छेड काढली जाते. विरोध करणाऱ्यांना मारहाण केली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून जाधव चौकात सर्रास खासगी वाहतूक सुरू आहे. येथून रोज गोंदिया, पवनी, लाखांदूर, ब्रह्मपुरी,वडसा, आरमोरी, गडचिरोली, अर्जुनी, साकोली, हिंगणघाट, वर्धा, वणी, वरोरा, चंद्रपूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या १८० ते २०० खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. ट्रॅव्हल्स मालकांनी पोसलेले गुंड २० टक्के कमिशनवर वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांपुढे प्रवाशांचे बुकिंग करतात. काही गुंडांनी खासगी बस चालकांकडून प्रत्येकी ५० रुपये वसुली करून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. ही रक्कम ते गरजूंना व्याजाने कर्ज देण्यासाठी वापरतात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी १० हजार रुपये पाठविण्यात आले आहेत. या रकमेतून जाधव चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून परिस्थितीचे निरीक्षण करावे, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)