शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:54 IST

नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन निजंर्तुक झालेल्या पाण्याचा वापर बगिच्यात करण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते गणतंत्र दिनी करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन निजंर्तुक झालेल्या पाण्याचा वापर बगिच्यात करण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते गणतंत्र दिनी करण्यात आले.यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती भगवान मेंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर, राईट वॉटर सोल्युशनचे अभिजित गान आदी उपस्थित होते.महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोरून वाहणाऱ्या नाल्यावर हे संयंत्र लावण्यात आले आहे. जपानच्या जोकासु कंपनीचे हे संयंत्र पाच हजार लिटर प्रति दिवस क्षमतेचे आहे. पाण्यावर पुनर्प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने हे संयंत्र उभारण्यात आले आहे. या संयंत्राद्वारे नाल्यातील दूषित पाणी निजंर्तुक करून या पाण्याचा वापर महापालिका परिसरातील बगिच्यात करण्यात येईल. यामुळे पाण्याची आणि विजेची बचत होणार आहे.नागपूर शहरात असलेल्या नाल्यांवर विविध ठिकाणी असे संयंत्र उभारून क्रीडांगणे, बगिचे व पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी या पाण्याचा वापर करण्यात येईल, जेणेकरून शुद्ध पाण्याची बचत होईल, असे संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनपाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSandip Joshiसंदीप जोशी