शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शाखांचा शुभारंभ

By admin | Updated: September 24, 2015 03:28 IST

मल्टीस्टेट शेड्यूल्ड नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शाखात आणखी पाच शाखांची भर पडणार असून, शहरातील शास्त्री लेआऊट खामला, ..

नागपूर : मल्टीस्टेट शेड्यूल्ड नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शाखात आणखी पाच शाखांची भर पडणार असून, शहरातील शास्त्री लेआऊट खामला, भगवाननगर रामेश्वरी, पुणे, भंडारा आणि छत्तीसगडमधील दुर्ग येथे प्रत्येकी एक शाखा मिळून सर्व शाखांचे कामकाज २४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नागपुरातील खामला शाखा प्लॉट नं. ४३, त्रिशरण लेआऊट, मिलेनियम टॉवर, सोमलवार शाळेसमोर सुरू होत असून, भगवाननगर शाखा बांते सुपर बाजाराच्यावर, बँक कॉलनी, भगवाननगर येथे सुरू होत आहे. राज्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र पुणे येथील शाखा कोथरुड येथे करिष्मा सोसायटीजवळ सुरू होत असून, यानिमित्ताने कोथरुड परिसरातील नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहे. विदर्भात शाखांचे जाळे वाढवीत भंडारा येथे नशीने सदन, विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनी, जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यासमोर तकीया वॉर्ड, भंडारा येथे सुरू होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूरनंतर दुर्ग येथे बँकेची शाखा सुरू होत असून शंकरनगर रोड, तरुण अ‍ॅडलॅबसमोर देवांगण यांच्या जागेत ही शाखा सुरू होत आहे. पुणे तसेच खामला शाखेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४, भगवाननगर शाखेची सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० आणि दुर्ग शाखेची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० राहणार आहे. बँकेची प्रस्तावित सहावी शाखा मेडिकल रोड चंदननगर येथे नवरात्र काळात सुरू होत आहे. या विस्तारानंतर बँकेच्या एकूण ४५ शाखा झाल्या आहेत. सर्व शाखात लॉकर्सची सुविधा, एटीएम, कॅश ड्रॉप सेवा, एनईएफटी, अत्याधुनिक बँकिंगची सुविधा आहे. ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक मंडळातर्फे अध्यक्ष संजय भेंडे, उपाध्यक्ष राजेश लखोटिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गोडबोले यांनी केले आहे. (वा.प्र.)