शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलणार हास्य

By admin | Updated: May 17, 2017 02:09 IST

अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय

शासकीय दंत रुग्णालय : कृत्रिम दात तयार करणारे आले ‘कॅडकॅम’ यंत्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक असलेली १ कोटी ५५ लाख रुपयांची ‘कॅडकॅम’ नावाचे उपकरण उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कृत्रिम दात तयार करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, पूर्वी कृत्रिम दातासाठी आठवड्याची प्रतीक्षा करावी लागायची. विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील रुग्णांसाठी नागपुरातील शासकीय दंत रुग्णालय आशेचे किरण ठरले आहे. दातांच्या वाढत्या समस्या, वेडेवाकडे निघालेले दात, दात पडल्यानंतर कृत्रिम दातांचा वापर आदी समस्यांवर मात करण्यासाठी दंत रुग्णालयात अत्याधुनिक ‘कॅडकॅम’ यंत्राची गरज होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी रुग्णालय प्रशासनाने या यंत्राच्या खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु, निधीअभावी वा इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रस्ताव शासनदरबारी पडून होता. दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडे (डीपीसी) विकास कामे व यंत्र खरेदीसाठी निधीचा प्रस्ताव दंत प्रशासनाकडून पाठविला जात होता. २०१६-१७ मध्येही हा प्रस्ताव पाठविण्यात आला. या यंत्रासाठी ‘डीपीसी’ने १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागानेही याला परवानगी देताच खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन हे उपकरण ११ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांसाठी फायद्याचे ‘कॅडकॅम’ या यंत्रामुळे काही मिनिटांमध्येच नवीन दात तयार होतो. नुकत्याच केलेल्या प्रात्यक्षिकामध्ये एका मुलीला नवीन दात बसविण्यात आला आहे. लवकरच या यंत्राचे अधिकृत उद्घाटन करून रुग्णसेवेत दाखल होईल. कृत्रिम दाताच्या शुल्काबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. -डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता, शा. दंत महाविद्यालय व रुग्णालय