शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

- तर नागपुरात लातूरसारखी स्थिती

By admin | Updated: April 20, 2016 03:09 IST

लातूर-मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पाणी असले तरी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येथेही दुष्काळजन्य स्थिती निर्माण होऊ शकते.

दररोज लाखो लिटर पाणी जाते वाया : अपव्यय थांबविला नाही तर गंभीर दुष्परिणामनागपूर : लातूर-मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पाणी असले तरी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येथेही दुष्काळजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. कारण पाण्याचा इतर स्रोत नाही आणि उपलब्ध पाणी योग्य प्रमाणात उपयोगात आणणे गरजेचे आहे. अन्यथा अपव्यय झाला तर उपलब्ध पाणी संपण्याची स्थिती गंभीर पाणी संकट निर्माण करू शकते. यात प्रशासनासह प्रत्येक नागरिकाने सहभाग देण्याची आवश्यकता आहे. मनपाच्यावतीने शहराबाहेरील वस्त्यांमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यादरम्यान दररोज जवळपास एक लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. टँकरमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचे जतन करून अन्य वस्त्यांमध्ये पाणी पोहोचविण्याचे आवाहन सामाजिक संघटनांनी केले. मनपातर्फे जवळपास २३० आणि ओसीडब्ल्यूचे ११० अशा एकूण ४४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. ओसीडब्ल्यू टँकर योग्यस्थितीत असल्याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी परवानगी देतच नाही. तर मनपाच्या २३० टँकरपैकी १०० पेक्षा जास्त टँकरवर झाकण नाही, शिवाय लिकेजमुळे त्यातून सतत पाणी वाहत असते. अशा १०० टँकरच्या प्रत्येकी १० अशा एकूण एक हजार फेऱ्या दररोज होतात. प्रत्येक टँकरमधून १०० लिटरपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले आहे. शहरात दररोज एक लाख लिटर पाणी वाया जाते. झाकण नसलेले आणि लिकेज असणारे टँकर तात्काळ बंद करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. नेटवर्क एरिया आणि नॉन मेट्रो एरियात पोहोचविण्यात येणारे पाणी सुभाननगर, डेप्टी सिग्नल, आसीनगर झोन, डम्पिंग यार्ड, म्हाळगीनगर, रेशीमबाग, वंजारीनगर, लक्ष्मीनगर, सेमिनरी हिल्स, वांजरा पाण्याच्या टाकीवरून टँकरमध्ये भरले जाते. या पाण्याच्या टाकीवरून टँकरमध्ये पाणी भरतानासुद्धा येथील कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. या चुका टाळल्या तर मोठ्या प्रमाणात पाणी बचत होऊ शकते. नागपुरात मुबलक पाणी आहे. पण दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर भविष्यात लातूरसारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार आहे.