शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लता मंगेशकर होस्टेलवर मारहाण

By admin | Updated: September 28, 2015 03:09 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका गटातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्येच हल्ला चढवला.

विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद : सहा विद्यार्थी गजाआडनागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका गटातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्येच हल्ला चढवला. शनिवारी रात्री १० च्या सुमारास एमआयडीसीतील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या होस्टेलवर ही घटना घडली. अरुण भीमराव मोराळे (वय २४) आणि विशाल कंठारे (वय २३) हे दोघे लता मंगेशकरच्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असून, ते एनआरआय होस्टेल, रूम नं. एफ ७ मध्ये राहतात. त्यांच्या दुचाकीचा कट लागल्यामुळे शशांक नावाच्या विद्यार्थ्यासोबत या दोघांचा वाद झाला होता. त्यामुळे या दोघांना धडा शिकविण्यासाठी याच होस्टेलवर राहणारे आरोपी प्रवीण रामप्रीत मिश्रा, राहुल सुमीरसिंग डांगर, वनीत भारतभूषण अरोडा, निशांत अनिलकुमार डांगी, बीरकंवर सुखवनसिंग अय्यर, यशइंदू युवराज फुल्लर हे सर्व शनिवारी रात्री अरुण आणि विशालच्या रूमवर चालून गेले. त्यांनी या दोघांना शिवीगाळ करीत शशांकसोबत का भांडण केले, असा सवाल करून जोरदार मारहाण केली. जीवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकारामुळे होस्टेल परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अरुण मोराळेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. या सर्वांना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)