शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नागपूर लता मंगेशकर रुग्णालयातील इन्टर्न संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:11 IST

विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील (मेडिकल) प्रशिक्षणार्थी (इन्टर्न) डॉक्टर दोन आठवड्यापूर्वी संपावर गेले होते, आता डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले आहेत. मेडिकलच्या इन्टर्न्सएवढेच विद्यावेतन देण्याची मागणी आहे. गेल्या चार दिवसांपासून संप सुरू असल्याने याचा फटका रुग्णसेवेवर बसल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देविद्यावेतन वाढविण्याची मागणी : ८० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील (मेडिकल) प्रशिक्षणार्थी (इन्टर्न) डॉक्टर दोन आठवड्यापूर्वी संपावर गेले होते, आता डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले आहेत. मेडिकलच्या इन्टर्न्सएवढेच विद्यावेतन देण्याची मागणी आहे. गेल्या चार दिवसांपासून संप सुरू असल्याने याचा फटका रुग्णसेवेवर बसल्याचे बोलले जात आहे.राज्यभरातील सर्व मेडिकल कॉलेजचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर १३ जूनपासून संपावर गेले होते. आठवडाभराच्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दोन महिन्यात विद्यावेतन वाढविण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डिगडोह येथील एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स व लता मंगेशकर रुग्णालयातील ८० प्रशिक्षणार्थी डॉक्टर २५ जूनपासून संपावर गेले. येथील इन्टर्नना केवळ तीन हजार विद्यावेतन दरमाह दिले जाते. इतक्या कमी विद्यावेतनात खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न येथील डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन दोन महिन्यापूर्वी कॉलेज व्यवस्थापनेला निवेदन दिले होते. त्यानंतरही व्यवस्थापनाकडून दखलही घेण्यात आली नाही. यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थी डॉक्टर अनिश्चितकालीन संपावर गेले. प्रशिक्षणार्थी डॉक्टर असले तरी रुग्णांचे रक्ताचे नमुने घेणे, सलाईन लावणे, रक्त चढविणे, रुग्णांच्या नोंदी ठेवणे आदी कामे करतात. परंतु आता हे डॉक्टरच नसल्याने थोड्या फार फरकाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. विद्यावेतन वाढ होईपर्यंत संप सुरूच राहणार असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप