‘हाय नागपूर’ ने शहर जागविणाऱ्या शुभमचा गुडबाय!नागपूर : या शोने तरुणाईला इतके वेड लावले की मध्ये काही दिवस शो बंद होता तेव्हा तो पुन्हा सुरू करण्यासाठी तरुणाईचे ग्रिटिंग त्याच्या घरी पोहोचायचे पोस्टाने.सोमवारी होता शेवटचा शो शुभमचा ‘हाय नागपूर’ हा शो खूपच लोकप्रिय होता. त्याने आपल्या वाणी प्रभुत्वाने अनेक फॅन्स जोडले होते. परंतु त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या काही दिवसांपासून तो हा शो थांबवण्याचा विचार करीत होता. त्याचा निर्णय पक्का झाला होता. येत्या सोमवारी तो शेवटचा लाईव्ह शो करणार होता. परंतु काळाने त्याला ती संधीही दिली नाही. शुभमवर सायंकाळी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.(प्रतिनिधी)
सोमवारी होता शेवटचा शो
By admin | Updated: October 21, 2016 02:39 IST