शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

नागपूर मेट्रो प्रकल्पात अखेरचे सेगमेंट लॉन्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:41 IST

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपॉरेशनच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पातील एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावरील हॉटेल रॅडिसन चौक, जेपीनगर मेट्रो स्टेशनसमोरील व्हाय-डक्ट कामातील स्पॅनमध्ये अखेरचा सेंगमेंट बुधवारी लॉन्च करण्यात आले. कामाच्या वेगामुळे खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३ कि़मी. मेट्रो मार्गावर वर्ष-२०१९ च्या मार्चअखेरीस मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सेंटमेंट लॉन्चिंगनंतर पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देएअरपोर्ट दक्षिण ते सीताबर्डी रिच-१ : मेट्रो मार्चमध्ये धावणार

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपॉरेशनच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पातील एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावरील हॉटेल रॅडिसन चौक, जेपीनगर मेट्रो स्टेशनसमोरील व्हाय-डक्ट कामातील स्पॅनमध्ये अखेरचा सेंगमेंट बुधवारी लॉन्च करण्यात आले. कामाच्या वेगामुळे खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३ कि़मी. मेट्रो मार्गावर वर्ष-२०१९ च्या मार्चअखेरीस मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सेंटमेंट लॉन्चिंगनंतर पत्रपरिषदेत दिली. 

एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावर ०.५ कि़मी. पॉकेट ट्रॅकमध्ये सात एलिव्हेटेड स्टेशन राहणार आहे. ४.५ कि़मी. लांब रूळ टाकण्यात आला आहे. व्हाय-डक्टमध्ये ३१६ स्पॅन असून त्यापैकी २९६ स्पॅन व्हाय-डक्टकरिता आणि २० स्पॅन पॉकेट ट्रॅकसाठी आहेत. व्हाय-डक्टची लांबी २२ मी., २५ मी., २८ मी., ३१ मी. आणि ३४ मीटर आहे. रिच-१ च्या या मार्गावर १६५६ पाईल्स, ३०९ पाईल कॅप, ३०९ पिलर, २८३ पिलर कॅप, १३ पोर्टल बीम आणि ६२ पिलर आर्मचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये सर्वाधिक १३६ पाईल कास्ट तर जानेवारी २०१७ मध्ये सर्वाधिक २७ पाईल कॅप तयार करण्यात आल्या होत्या. पायलिंगच्या कामासाठी सात हॅड्रोलिक रिंगसह १५ ट्रायपोड तैनात करण्यात आले. ९५ टक्के पायलिंगची कामे २४ महिन्यात पूर्ण करण्यात आली. पॉईल कॅप, पिलर, पिलर कॅपची कामे १२ मार्च २०१६ आणि १५ एप्रिल २०१६ ला सुरू करण्यात आली होती. २६९४ सेंगमेंटचे कास्टिंग २१ नोव्हेंबर २०१८ ला पूर्ण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.व्हाय-डक्ट बनविण्यासाठी छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडण्यात आला. वर्धा मार्गावरील डेबलडेकर पुलामुळे व्हाय-डक्टची उंची जमिनीपासून २५ मीटर आणि रेल्वेमुळे एकूण उंची २७ मीटर राहील. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना नागपूरचे सौंदर्य न्याहाळता येईल. रस्ता ब्लॉक न करता आव्हानात्मक बांधकाम वेळेत पूर्ण केले. कामासाठी ६० हजार मेट्रिक टन सिमेंट,२८ हजार मेट्रिक टन स्टील लागल्याची माहिती मेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी दिली.यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अभियांत्रिकी चमूचा दीक्षित यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. पत्रपरिषदेत महामेट्रोचे रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर, उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळवे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.