शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांच्या पोषण आहारात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:21 IST

अंगणवाडी सेविका संपावर गेल्यामुळे आधीच बालकांची गैरसोय होत असताना आणखी एक संतापजनक बाब बुधवारी नागपुरात उघडकीस आली.

ठळक मुद्देनऊ केंद्रांवर संतापजनक प्रकार : आशा वर्कर्सनी केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंगणवाडी सेविका संपावर गेल्यामुळे आधीच बालकांची गैरसोय होत असताना आणखी एक संतापजनक बाब बुधवारी नागपुरात उघडकीस आली. नंदनवन भागातील अंगणवाड्यांमध्ये बचत गटाकडून आलेल्या शेंगदाणे व गुळाच्या लाडूमध्ये अळ््या आढळून आल्या. एक-दोन नाही तर नऊ अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात हा प्रकार आढळून आल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. पोषण आहार वितरणाची जबाबदारी दिलेल्या आशा वर्करनी बाल विकास अधिकाºयांकडे याबाबत तक्रार दिली.अंगणवाडी सेविका गेल्या काही दिवसांपासून संपावर गेल्याने बालकांची गैरसोय टाळण्यासाठी आशा वर्कर्सना पोषण आहार वितरणाची जबाबदारी दिली आहे. बचत गटाच्या माध्यमातून हा पोषण आहार पुरविला जातो. नंदनवन भागातील दर्शन कॉलनी, सद््भावनानगर आदी ठिकाणच्या केंद्रावर पोषण आहार म्हणून शेंगदाणे व गुळाचे लाडू पाठविण्यात आले होते. बुधवारी हे लाडू फोडून पाहिले असता यामध्ये चक्क जिवंत अळ््या आढळून आल्या. आशा वर्कर फुलन घुटके व शारदा घारपांडे यांनी आढळून आलेला प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे सांगितले. आधी एकाच अंगणवाडीत हा अळ््यायुक्त पोषण आहार पोहचल्याची शंका होती. मात्र इतरही अंगणवाडी केंद्रावर हा प्रकार असल्याचे लक्षात आले. या भागातील केंद्र क्रमांक १०१, ११८, १२९, १२४, १३९, १४०, १००, ८७, ९५ अशा एकूण नऊ केंद्रावरील पोषण आहार वाटणाºया आशा वर्कर्सनी याबाबत तक्रार केली. फुलन घुटके यांच्या नेतृत्वात जयश्री पोटभरे, यामिनी रघुवंशी, आशा इंगोले, एस.व्ही. रामटेके आदी आशा वर्कर यांनी महानगरपालिकेच्या दर्शन कॉलनीच्या आरोग्य केंद्रावर याबाबत माहिती दिली. त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी, रेशीमबाग यांना याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याचे घुटके यांनी सांगितले.अंगणवाडी केंद्रावर बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविण्यात येतो. बुधवारी खिचडी आणि लाडू दिल्या गेले होते. सहसा हे लाडू न फोडताच बालकांना खायला दिले जातात. फोडून बघितल्यामुळे हा प्रकार आढळून आल्याने गरीब मुलांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळला जात असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.