शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी मोठे प्रकल्प फायद्याचे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:29 IST

राज्यात लहान-मोठे असे एकूण ३४० प्रकल्प आहेत. परंतु यातील अनेक प्रकल्प भूसंपादन कायदा, पुर्नवसन कायदा, वनसंवर्धन कायदा अशा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देपरिणय फुके : ‘विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकºयांचे अश्रू’वर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात लहान-मोठे असे एकूण ३४० प्रकल्प आहेत. परंतु यातील अनेक प्रकल्प भूसंपादन कायदा, पुर्नवसन कायदा, वनसंवर्धन कायदा अशा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.परिणामी राज्याची सिंचन क्षमता कमी होत असून सिंचनासाठी मोठे प्रकल्प फायद्याचे नाहीत, असे मत विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनिअर मित्र परिवारातर्फे बजाज नगरातील कृषी विद्यापीठाच्या अतिथीगृहात शुक्रवारी आयोजित ‘विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकºयांचे अश्रू’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.यावेळी मंचावर खा. नाना पटोले, जलसंधारण विभागाचे सेवानिवृत्त उपमुख्य अभियंता किशोर वरंभे, कृषी विद्यापीठातील मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख सुभाष टाले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्र्लावार उपस्थित होते.आ. फुके पुढे म्हणाले, सिंचनाची सोय होऊन शेतकºयांच्या डोळ्यातील अश्रू पुसायचे असतील तर मोठ्या प्रकल्पांवर फार आधारित न राहता जलयुक्त शिवारसारखे पर्याय पूर्ण क्षमतेने वापरले गेले पाहिजे.किशोर वरंभे म्हणाले, पाण्याच्या विषयात राजकारण आणल्यानेच सिंचनाचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून मोठमोठी धरणे उभारण्यात आली. परंतु धरण क्षेत्रातील गावे उठायला तयार नाहीत. परिणामी पाणी साठवता येत नाही. आपली व्होट बँक बिघडू नये म्हणून सरकारही कठोर वागायला तयार नाही.पण, सरकारला हे समजत नाही की जमीन न बुडवता प्रकल्प उभेच राहू शकत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुभाष टाले यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे सिंचनाच्या समस्येवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक मिलिंद राऊत यांनी तर संचालन अजय तायवाडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर व सचिव प्रणय पराते यांनी सहकार्य केले.