शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

गरिबाचा भूखंड झाला बेपत्ता!

By admin | Updated: April 28, 2016 02:57 IST

अर्धवट उपाशीपोटी राहून, पै पै जमवून एका गरीब व्यक्तीने २७ वर्षांपूर्वी विकत घेतलेला भूखंड बेपत्ता झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष : तीन महिन्यानंतरही नोंदवला नाही ‘एफआयआर’राहुल अवसरे नागपूरअर्धवट उपाशीपोटी राहून, पै पै जमवून एका गरीब व्यक्तीने २७ वर्षांपूर्वी विकत घेतलेला भूखंड बेपत्ता झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी या फसवेगिरीची तक्रार होऊनही पोलिसांनी ‘एफआयआर’ नोंदवून न घेता, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्षच केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या ६८/२००८ क्रमांकाच्या फौजदारी रिट याचिकेत दखलपात्र स्वरूपाचा अपराध दिसत असल्यास प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवणे अनिवार्य आहे, असा निवाडा देऊन दिशानिर्देश दिलेले आहेत. एखाद्या प्रकरणाच्या तक्रारीची चौकशीही सात दिवसांहून अधिक असू नये, विलंबाची वस्तुस्थिती आणि कारणाची नोंद पोलीस ठाण्यातील सामान्य नोंदपुस्तिकेत करणे अनिवार्य आहे, असेही दिशानिर्देशात नमूद करण्यात आलेले आहे.हुडकेश्वर आशीर्वादनगर येथे राहणाऱ्या महादेव व्यंकटी मलपेद्दीवार यांनी १९ एप्रिल १९८९ रोजी श्री शिवशक्ती गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या मौजा सोनेगाव येथील ८३ क्रमांकाचा २७३३ चौरस फुटाचा भूखंड विकत घेतला होता. रोजगारासाठी ते गुजरात राज्यातील सुरत येथे निघून गेले होते. सप्टेंबर २०१५ मध्ये ते नागपुरात परत आले. ते आपला भूखंड पाहण्यास गेले असता, तो बेपत्ता होता. भूखंडावर घर बांधलेले होते. मलपेद्दीवार यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर केला असता, खुद्द संस्थेच्या अध्यक्षाने एका महिलेला हा भूखंड ३ सप्टेंबर १९९४ रोजी विकल्याचे त्यांना समजले. आजच्या बाजारभावाप्रमाणे हा भूखंड एक कोटी रुपयांचा आहे. लागलीच मलपेद्दीवार यांनी १९ जानेवारी २०१६ रोजी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्याकडेही तक्रारी केल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांनी १८ मार्च २०१६ रोजी मलपेद्दीवार यांना या भूखंडाचे मूळ साक्षांकित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. ते त्यांनी सादरही केले. जगताप यांनी स्वत:च त्यांचे बयाणही नोंदवून घेतले. परंतु दुर्दैवाने अद्यापही एफआयआरची नोंदच करण्यात आलेली नाही. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या एफआयआर नोंदवण्याच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष केल्याने एका गरिबावर स्वत:चा भूखंड गमावण्याची पाळी आली आहे.