शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विकासासाठी भूखंडधारकांना सूट

By admin | Updated: July 13, 2017 02:38 IST

औद्योगिक विकासासाठी भूखंडधारकांना प्रीमियममध्ये सूट दिली जाणार आहे.

नगररचना विभागाच्या प्रस्तावात अंशत: बदल : स्थापत्य समितीची मंजुरी, प्रीमियममध्ये मिळणार सूट लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : औद्योगिक विकासासाठी भूखंडधारकांना प्रीमियममध्ये सूट दिली जाणार आहे. निवासी वापराकरिता १० टक्के आणि वाणिज्यिक वापराकरिता २० टक्के प्रीमियम द्यावा, अशी दुरुस्ती विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत केली जाणार आहे. संबंधित बदल करून नव्याने प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीने दिले. मनपा सभेने दिलेल्या निर्देशनानुसार औद्योगिक विभागातील जागेसंदर्भात नगररचना विभागाने दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची बुधवारी बैठक झाली. ती सभापती संजय बंगाले, उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्य विद्या कन्हेरे, पल्लवी श्यामकुळे, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगररचनाकार प्र. प्र. सोनारे आदी उपस्थित होते. नागपूर शहराची विकास नियंत्रण नियमावली ३१ मार्च २००१ अन्वये मंजूर झाली असून ती ९ एप्रिल २००१ पासून अमलात आली आहे. नागपूर शहराच्या मंजूर नियंत्रण नियमावली-२००० मधील नियम क्र. १४.२.१ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये फेरबदल करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी नगर रचना विभागाने तो महासभेपुढे ठेवला होता. औद्योगिक विभागातील कोणतीही मोकळी जमीन किंवा जमिनी किंवा बंद औद्योगिक युनिटच्या जमिनीवर वाणिज्य विभागातील सर्व अनुज्ञेय वापर, वाणिज्य वापरातील अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांसह वापरता येईल. परंतु निवासी आणि किंवा गैरवाणिज्य वापराकरिता दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या वार्षिक शीघ्र सिद्ध गणकातील विकसित जमिनीच्या दराच्या २० टक्के प्रीमियमचा भरणा करावा लागेल आणि पूर्णपणे वाणिज्य वापराकरिता ४० टक्के प्रीमियमचा भरणा करावा लागेल, असा बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने दिला होता. यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी महासभेने हा विषय स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीकडे सोपविला होता. बुधवारी झालेल्या बैठकीत समितीने यामध्ये बदल सुचविला आहे. निवासी वापराकरिता २० ऐवजी १० टक्के तर वाणिज्य वापराकरिता ४० ऐवजी २० टक्के प्रीमियम भरणा करावा लागेल, असे बदल करून नव्याने प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले.