शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लखोबा लोखंडेची साथीदार सविता जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:05 IST

अनेक महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणारा आकाश माणिकलाल अग्रवाल (वय ४०) नामक लखोबा लोखंडेच्या पापात साथ देणारी आरोपी सविता कुंभारे ऊर्फ अग्रवाल हिला गोंदियावरून अटक करून बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी नागपुरात आणले.

ठळक मुद्देगोंदियात अटक : नागपुरात आणले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणारा आकाश माणिकलाल अग्रवाल (वय ४०) नामक लखोबा लोखंडेच्या पापात साथ देणारी आरोपी सविता कुंभारे ऊर्फ अग्रवाल हिला गोंदियावरून अटक करून बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी नागपुरात आणले.घटस्फोटित आणि विधवा तसेच एकाकी श्रीमंत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करायचे आणि संधी मिळताच त्यांची चल अचल संपत्ती विकून आर्थिक लुबाडणूक करायची, असा आरोपी अग्रवालचा धंदा होता.आरोपी अग्रवाल विविध नावाने वेगवेगळ्या ठिकाणी वावरतो. सध्या तो बेसा मनीषनगरातील स्वस्तिक अपार्टमेंटमध्ये राहत होता. सेकंड शादी डॉट कामच्या माध्यमातून तो एकाकी, विधवा, घटस्फोटित आणि निराधार श्रीमंत महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. आपला पेट्रोलपंप आहे, मोठे रेस्टॉरंट आणि फार मोठा व्यवसाय आहे, अशी थाप मारून आपण एकटेच आहोत. आपल्याला कुणीतरी जिव्हाळ्याचा साथीदार हवा आहे, अशी बतावणी करून तो संबंधित महिलेला आकर्षित करीत होता. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. नंतर तिच्या नावे असलेली चलअचल संपत्ती विकून तिला वाऱ्यावर सोडायचा. त्याने महाराष्टÑ तसेच मध्य प्रदेशातील अनेक महिलांशी अशा प्रकारे दगाबाजी करून त्यांच्या जीवनाचा खेळखंडोबा केला आहे. २३ आॅगस्टला दुपारी ३.३० ला त्याने अशाच प्र्रकारे बेसा-बेलतरोडीत वर्धेतील एका महिलेला भेटीला बोलवले. तिला घर आणि व्यवसाय दाखवण्याच्या बहाण्याने आपल्या डस्टर कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमध्येच तो तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. मात्र, त्याच्या विकृतीची शिकार बनलेल्या एका महिलेने त्याचा पाठलाग करून त्याला बेस्यात रंगेहात पकडले. वर्धेतील महिलेच्याही ते लक्षात आणून दिले आणि या दोघींनी त्याला बेलतरोडी पोलीस ठाण्यात नेले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्या पापात सविता कुंभारे ऊर्फ अग्रवाल ही महिलादेखिल सहभागी असल्याचे लक्षात आले. ती त्याची बहीण बनून पीडित महिलांना फसवण्यासाठी अग्रवालची साथ देत होती. त्यावरून तिचाही शोध सुरू केला. ती पळून गेली होती. आज ती गोंदियात आल्याचे कळताच तिला अटक करून नागपुरात आणण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर तिची चौकशी सुरू होती.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक