शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लकडगंज झोनच्या शाळांमध्ये दुरावस्था

By admin | Updated: September 5, 2015 03:16 IST

महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमध्ये ...

शिक्षण सभापतींनी मांडले वास्तव : महापौरांना सोपविला अहवालनागपूर : महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अव्यवस्था आढळून आली आहे. शिक्षण सभापती गोपाळ बोहरे यांनी महापालिकेच्या २० शाळांची पाहणी केली. यात हे वास्तव उघड झाले आहे. लकडगंज झोन अंतर्गत शाळांमध्ये सर्वाधिक विद्यार्थीसंख्या आहे. मात्र, या शाळांमध्ये सुविधांचा अभाव व शिक्षकांची मनमानी असल्याचे आढळून आले आहे. बोहरे यांनी शाळांच्या पाहणीचा विस्तृत अहवाल महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सोपविला असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सुचवित शिफारशीही केल्या आहेत. समितीने धरमपेठ झोनमधील सात, गांधीबाग झोनमधील पाच व लकडगंज झोनमधील आठ शाळांची गेल्या २५ दिवसात पाहणी केली. लकडगंजमधील संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या तीन शाखा- मुख्य शाखा, मिनीमाता नगर व वांजरा शाखा येथे सर्वाधिक तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. याच शाळेतून या वर्षी दहावीचा टॉपर आला. असे असतानाही समितीला पाहणीदरम्यान या शाळेविषयी बऱ्याच तक्रारी मिळाल्या. शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाहीत. नियमित वर्ग होत नाहीत. लोकमतने या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. शिक्षण सभापतींच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सभापती बोहरे यांनी सांगितले की, संजयनगर माध्यमिक शाळेत नववी व दहावीचे वर्ग नियमित होत नाहीत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. याशिवाय वर्गात येणारे शिक्षक शिकवत नाही. मुख्याध्यापकाकडे तक्रार केली तर त्याची सुनावणी होत नाही. शौचालयाची स्थिती वाईट आहे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या शाळेकडे विशेष लक्ष देण्याची शिफारस समितीने आपल्या अहवालात केली आहे. समितीमध्ये नगरसेविका रश्मी फडणवीस, वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे, शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले, सीमा खोब्रागडे यांचा समावेश होता.