शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रस्त्याची गुणवत्ता तपासणारी प्रयोगशाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:12 IST

नागपुरातच नाही, तर संपूर्ण राज्यात रस्त्याचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु रस्त्याची गुणवत्ता तपासणारी नागपूर जिल्ह्याची प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद पडली आहे.

ठळक मुद्देसरपंच भवनात होती प्रयोगशाळाप्रयोगशाळेसाठी जि.प.चा शासनाकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातच नाही, तर संपूर्ण राज्यात रस्त्याचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु रस्त्याची गुणवत्ता तपासणारी नागपूर जिल्ह्याची प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद पडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतर्फे स्वत:ची प्रयोगशाळा तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. बांधकाम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या सरपंच भवनात पंतप्रधान ग्राम सडक योजनेची प्रयोगशाळा होती. कुठल्याही रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर गुणवत्तेचा अहवाल प्रयोगशाळेतून मिळाल्यानंतरच कंत्राटदाराचे बिल दिले जात होते. परंतु ही प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या अभावी बंद असल्याने, शासकीय तंत्रनिकेतन येथून रस्त्याच्या गुणवत्तेचा अहवाल मिळवावा लागतो आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याकरिता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्राची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना समजली जाते. जिल्हा परिषदेतंर्गत येणाºया रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या प्रयोगशाळेद्वारे केली जात होती. परंतु गेल्या ४ महिन्यांपासून ही प्रयोगशाळाच बंद पडली आहे. सोमवारी बांधकाम समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. बैठकीत जिल्हा परिषदेची स्वतंत्र प्रयोगशाळा तयार करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला. त्याचबरोबर २०१७-१८ या आर्थिक वर्षात संपूर्ण निधी खर्च करण्यात आल्याबद्दल बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.वनविभागाकडून नियमांचे उल्लंघनसामाजिक वनीकरण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. परंतु हे वनीकरण जिल्ह्यातील ग्राम रस्ते आणि इतर जिल्हा रस्ते यांच्या हद्दीत केले जात आहे. त्यामुळे या रस्त्यांची रुंदी कमी होत आहे. हे वनीकरण रस्त्याच्या टोकावर करण्यात यावे, असा नियम असतानासुद्धा त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे वन विभागाने वनीकरणापूर्वी ग्राम पंचायत किंवा जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे असे निवेदन वन विभागाला पाठविण्यात यावे, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच महावितरणतर्फे पोल उभारतानासुद्धा या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे असेच एक निवेदन महावितरणलासुद्धा पाठविण्यात यावे, असाही निर्णय या बैठकी दरम्यान घेण्यात आला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा