शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकलच्या ४५० अधिव्याख्यात्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:13 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) वेळोवेळी पदनिर्मिती, पदभरती केली जात नसताना व कालबद्द पदोन्नती दिली जात नसताना आता अधिव्याख्याता पदावर तात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देतात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय : मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) वेळोवेळी पदनिर्मिती, पदभरती केली जात नसताना व कालबद्द पदोन्नती दिली जात नसताना आता अधिव्याख्याता पदावर तात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यभरातील सुमारे ४५० अधिव्याख्यात्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. विशेष म्हणजे, याच अधिव्याख्यात्यांच्या भरवशावर मेडिकलचा डोलारा उभा आहे. आता त्यांना काढून टाकल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सहावा वेतन आयोग लागू करताना ‘अधिव्याख्याता’च्या नावात बदल करून ‘सहायक प्राध्यापक’ हे नामकरण केले होते. परंतु याच विभागाला सहायक प्राध्यापक नावाचा विसर पडल्याचे दिसून येते. विभागाने काढलेल्या या शासन निर्णयात सहायक प्राध्यापकाच्या जागी ‘अधिव्याख्याता’ पदनाम लिहिले आहे.राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता पदावर लोकसेवा आयोगामार्फत किंवा निवड मंडळामार्फत उमेदवार उपलब्ध होईपर्यंत या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी मेडिकलच्या अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय मंडळाची समिती गठित करण्यात आली आहे. या मंडळाकडून १२० दिवसांची तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांकडून ३६० दिवसांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली जात होती. परंतु वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यावर आक्षेप घेत ही पदे अपवादात्मक स्थितीमध्ये न भरता ती सर्रास भरण्याची वृत्ती वाढीस लागल्याची, नियमित नियुक्तीद्वारे सदर पद भरल्यानंतरही तात्पुरता नियुक्त उमेदवार कार्यरत राहत असल्याचे, तर काही उमेदवार न्यायालयात जाऊन आदेश प्राप्त करून सेवेत कार्यरत राहत असल्याने व पुढे नियमित सेवेचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करीत असल्याने आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने अधिव्याख्याता पदावर तात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. यात ज्यांच्या नियुक्त्या ३६० दिवस पूर्ण झाल्या असतील त्या तत्काळ संपुष्टात आणण्याच्या व संबंधितास पुनश्च नियुक्ती न देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. परंतु अपवादात्मक परिस्थितीत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषाची पूर्तता करण्यासाठी सबंधित उमेदवारांना नियुक्ती देणे आवश्यक असल्यास तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्याचेही म्हटले आहे.मेडिकलचे ७७ तर मेयोतील २० सहायक प्राध्यापक अडचणीतनागपूर मेडिकलमधील साधारण ७७ तर मेयोतील २० सहायक प्राध्यापक (अधिव्याख्याता) आर्थिक, सामाजिक आणि कार्यालयीन सोयींपासून दूर असतानाही इमानेइतबारे कर्तव्य बजावत आहे. विशेषत: मेडिकलमधील अपघात विभागापासून ते ट्रॉमा केअर सेंटर, सुपर स्पेशालिटी, रक्तपेढीसह विविध विभागात सहायक प्राध्यापक कार्यरत आहे. या सर्वांची नियुक्त रद्द झाल्यास या दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे.शासन निर्णय मागे घेतला जाईलअधिव्याख्याता पदावर तात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या सोयींसाठी व रुग्ण हिताच्या दृष्टीने हा निर्णय येत्या दोन दिवसांत मागे घेण्यात येईल.-गिरीश महाजनवैद्यकीय शिक्षण मंत्री

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टर