शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कुहीचा ठाणेदार गजाआड

By admin | Updated: June 28, 2017 02:52 IST

बार आणि रेस्टॉरंटच्या संचालकाला पाच लाखांची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारणाऱ्या कुहीचा ठाणेदार

उपनिरीक्षकही अडकला े दोन लाखांची लाच े एसीबीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बार आणि रेस्टॉरंटच्या संचालकाला पाच लाखांची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारणाऱ्या कुहीचा ठाणेदार आणि उपनिरीक्षकाच्या एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री मुसक्या बांधल्या. या घडामोडीमुळे पोलीस खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.तक्रारकर्त्यांचे नागपूर जिल्ह्यातील कुही जवळ बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट आहे. महामार्गावर ५०० मीटरच्या आत असल्यामुळे हा बार बंद झाला. त्यामुळे बार मालकाने आजूबाजूची जागा खरेदी करून हॉटेलचे बांधकाम मागच्या भागात सुरू केले. त्यामुळे बाजूच्या जमीनमालकासोबत त्यांचा वाद सुरू झाला. या प्रकरणात दोन्हीकडून कुही पोलिसांकडे तक्रारी झाल्या. विरोधी जमीनमालकाच्या तक्रारीचा आधार घेत कुहीचे ठाणेदार सुभाष काळे यांनी बारमालकाला धारेवर धरले. तुमच्यावर कारवाई करतो, असा धाक दाखवून पाच लाखांची लाच मागितली. त्यामुळे मंगळवारी दुपारी बार मालकाने सरळ नागपुरात येऊन एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी तातडीने पंच पाठवून तक्रारीची शहानिशा करवून घेतली. तक्रार खरी असल्यामुळे अधीक्षक पाटील यांनी एसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद तोतरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाईसाठी कुहीला पाठविले. ठरल्याप्रमाणे बार मालकाने ठाणेदार काळेंसोबत संपर्क करून लाचेची रक्कम जास्त होते, ती कमी करा, असे म्हणत लगेच रक्कम देण्याची तयारी दाखवली. काळेंनी घासाघीस करून दोन लाख रुपये पाहिजे, असे म्हटले. ही रक्कम घेण्यासाठी स्वत:सोबत पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यालाही पुढे केले. बार मालकाने रक्कम मोठी असल्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये या अन् घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार, ठाणेदार काळे आणि उपनिरीक्षक चव्हाण हे दोघे रात्री ७.३० च्या सुमारास हॉटेलमध्ये आले. त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून बसलेल्या एसीबीच्या पथकाने या दोघांच्या मुसक्या बांधल्या. आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच ठाणेदार काळे आणि उपनिरीक्षक चव्हाण याने कारवाई टाळण्यासाठी बरीच आरडाओरड केली. मात्र, एसीबीच्या पथकाने त्यांचा विरोध हाणून पाडत त्यांना जेरबंद केले.४० हजार घेतलेविशेष म्हणजे, पाच लाखांची लाच मागणाऱ्या ठाणेदार सुभाष काळेने तक्रारकर्त्यांना एवढे भयभीत केले की त्यांनी सोमवारी ४० हजार रुपये देऊन वेळ मारून नेली. ही रक्कम मिळाल्याने काळे आणि चव्हाण निर्ढावले. बारमालक दहशतीत आले आहे, ते आपली तक्रार करणार नाही, असा त्यांचा गैरसमज झाला. मात्र, एसीबीने जेरबंद करताच आरोपी ठाणेदार आणि उपनिरीक्षक बारमालकाकडे अक्षरश: गयावया करू लागले.एसीबीचा चौकार आज मंगळवारी एकाच दिवशी एसीबीने कुहीच्या ठाणेदार आणि उपनिरीक्षकासह अन्य दोघांना पकडून चौकार मारला. अन्य दोन लाचखोरात एका सेक्शन इंजिनिअरचाही समावेश आहे. या दोन कारवाया भंडारा आणि गडचिरोलीत करण्यात आल्या. भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तक्रारकर्त्यांनी निर्धास्तपणे एसीबीच्या कार्यालयात येऊन भेटावे, असे आवाहन एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीसुद्धा पाटील यांनी दिली आहे.