शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

क्रिमिलेयर हे मागासवर्गीयांना विभाजित करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:16 IST

अनूसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आरक्षणविरोधी नेहमीच क्रिमिलेयरचा मुद्दा मांडतात. परंतु या मागणीला कुठल्याही स्वरुपात संविधानिक आधार नसून हा विषय मागासवर्गीयांना विभाजित करण्यासाठीच आहे,

ठळक मुद्देआरक्षण परिषद : वरिष्ठ अधिवक्ता चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनूसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आरक्षणविरोधी नेहमीच क्रिमिलेयरचा मुद्दा मांडतात. परंतु या मागणीला कुठल्याही स्वरुपात संविधानिक आधार नसून हा विषय मागासवर्गीयांना विभाजित करण्यासाठीच आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता डॉ. के.एस. चव्हाण यांनी येथे केले.स्वतंत्र मजदूर युनियन व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र, हजारी पहाड येथे रविवारी आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील हे मुख्य मार्गदर्शक होते. अध्यक्षस्थानी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय घोडके तर संघर्ष वाहिनीचे संयोजक दीनानाथ वाघमारे, डी.एम. खैरे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. चव्हाण म्हणाले, आरक्षण हे प्रतिनिधित्व असून ते सामाजिक असमानतेवर आधारित आहे. जगजीवन राम हे केंद्रीय मंत्री असताना व जीतनराम मांझी हे बिहारचे मुख्यमंत्री असताना दोघांनीही उद्घाटन केलेल्या पुतळ्याला दुसºयाच दिवशी गोमूत्राने धुतले गेले. म्हणजेच आर्थिक बाजू भक्कम झाल्यावरही सामाजिक स्थितीत फरक पडत नाही. म्हणून क्रिमिलेयरच्या माध्यमातून मागासवर्गीयांना आपसात लढविण्याचा प्रयत्न होणार असल्याने त्यास पूर्णपणे विरोध करण्याची गरज आहे. पदोन्नतीमधील आरक्षणासाठी ओबीसी सुद्धा पात्र असून एम. नागराज या केसमधील पाच न्यायाधीश हे इंदिरा सहानी या केसमधील नऊ जजेस बेंचच्या निर्णयाला व त्यावरील घटनादुरुस्तीला बदलू शकत नाहीत. न्यायालयात चुकीची बाजू मांडून आरक्षणविरोधी हे संविधानिक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने मागासवर्गीयांनी जन-आंदोलनासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय घोडके यांनी आरक्षण संवर्धनासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी दीननाथ वाघमारे, डी.एम. खैरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस एन.बी. जारोंडे यांनी केले. संचालन संघदीप उके यांनी तर वाय.के. कांबळे यांनी आभार मानले.पदोन्नतीतील आरक्षणासाठी ८ डिसेंबरला दिल्लीत आंदोलनजे.एस. पाटील यांनी सांगितले की, मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी हे आजही आरक्षणविरोधी कामगार संघटनांमध्ये सहभागी आहेत. मंत्रालयातील आरक्षणविरोधी अधिकारी हे सक्रिय असल्याने शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास विलंब झाला असून पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ८ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.