शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या कोंढाळीत आहे ग्रामस्थांच्या हक्काचे ज्ञानमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:12 IST

काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेबद्दल असलेला जिव्हाळा इतका आहे की, ही शाळा ग्रामस्थांच्या आपुलकीचे ज्ञानमंदिर झाली आहे.

ठळक मुद्देअनेक पिढ्या केल्या संस्कारीत शाळेने गाठले शतक, ग्रामस्थांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीत उदासीन दृष्टिकोन दिसून येतो. शाळेच्या इमारतीपासून भौतिक सुविधेपर्यंत अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घसरत चालली आहे. पण काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे चित्र याउलट आहे. येथे पालकांचा शाळेबद्दल असलेला जिव्हाळा इतका आहे की, ही शाळा ग्रामस्थांच्या आपुलकीचे ज्ञानमंदिर झाली आहे. विशेष म्हणजे या शाळेची शतकोत्तरी वाटचाल सुरू आहे.वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्यासारखे असे अनेक प्रश्न जिल्हा परिषदेच्या शाळांना भेडसावत आहेत. पण कोंढाळीच्या जि.प. शाळेला ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच ही शाळा परिसरातील खासगी शाळांवर मात करीत जिल्हा परिषदेचे अस्तित्व टिकवून आहे. गावातील अनेक पिढ्या या शाळेने संस्कारित केल्या आहेत. त्यामुळे शाळेबद्दलचा जिव्हाळा ग्रामस्थांना आहे. लोकसहभागातून शाळेत कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले आहे. शाळेवर आलेल्या कुठल्याही आपत्तीला, आवश्यकतेला, भौतिक सोयीसुविधांसाठी ग्रामस्थ एकत्र येऊन लोकसहभागातून निधी गोळा करतात. या शाळेबद्दलचा जेवढा जिव्हाळा ग्रामस्थांचा आहे, तेवढाच जिव्हाळा येथील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा आहे. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून ही शाळा प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.शाळेत शिकणारे विद्यार्थी शेतमजूर व कामगार वर्गातील आहेत. पण पहिल्या वर्गापासून येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळते आहे. शाळेच्या सर्व खोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी अध्यापनाच्या पद्धती बदलविल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाव दिला जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र