शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाचे मध्यवर्ती कार्यालय होणार कोल्हापुरात

By admin | Updated: May 12, 2017 01:05 IST

कोल्हापूर- रत्नागिरी-नागपूर महामार्ग

शोभना कांबळे ।  --लोकमत न्यूज नेटवर्क  रत्नागिरी : रत्नागिरी (मिऱ्या) - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रत्नागिरीच्या हद्दीतील कामासाठी आता कोल्हापूर येथे महामार्ग प्राधिकरण कार्यालय सुरू केले आहे. कोल्हापूर कार्यालयाचे प्रकल्प संचालक म्हणून बी. एस. साळुंखे यांची नियुक्तीही केली आहे. साळुंखे यांनी प्रांताधिकारी अमित शेडगे यांची भेट घेऊन चौपदरीकरणांसदर्भातील प्रक्रियेची गुरुवारी माहिती घेतली.रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रारंभ झाला आहे. यापैकी रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे देण्यात आली आहे. सध्या या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाची पहिली प्रक्रिया म्हणजे मोजणी सुरू होती. चौपदरीकरणसंदर्भातील तक्रारींचे निराकरण थेट येथील प्रशासनाला करता येत नव्हते. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय, सोलापूर येथे संपर्क ठेवावा लागत होता. प्रशासन, नागरिकांचीही गैरसोय होत असल्यानेच हे कार्यालय रत्नागिरीत असावे, अशी मागणी होत होती. मात्र ते आता कोल्हापूर येथे केल्याने सोलापूर येथील प्राधिकरण कार्यालयाऐवजी कोल्हापूरला संपर्क करणे सर्वांचे सोयीचे होईल. सध्या संयुक्त मोजणीला प्रारंभ झाला आहे. ही मोजणी मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती शेडगे यांनी दिली. भूसंपादन प्रक्रियेसाठी आवश्यक अधिसूचनेकरिता ‘३ ए’ चा प्रस्ताव या शासनाकडे पाठविला होता. तो मंजूर झाला असून त्यानुसार हरकती मागविण्यात आल्या आहेत.