शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोजागिरीचे दूध पिताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:40 IST

कोजागरी पौर्णिमेला खुल्या चंद्र प्रकाशात दूध आटवून पिण्याची परंपरा आहे. आकाशातून अमृताचा वर्षाव होत असल्याने हे दूध आरोग्यास लाभदायी असल्याची मान्यता आहे.

ठळक मुद्देभेसळीचे ग्रहण : खबरदारी घ्या, पाच लाख लिटरची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोजागरी पौर्णिमेला खुल्या चंद्र प्रकाशात दूध आटवून पिण्याची परंपरा आहे. आकाशातून अमृताचा वर्षाव होत असल्याने हे दूध आरोग्यास लाभदायी असल्याची मान्यता आहे. हा लाभ घेण्यासाठी आपण यंदा कोजागरी पौर्णिमा साजरी करण्याच्या बेतात असाल तर सावधान.कारण बाजारात भेसळयुक्त दुधाची आवक वाढल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे खबरदारी न बाळगल्यास आपल्याला नुकसानसुद्धा होऊ शकते.शहरात शुद्ध दुधाची कमतरता आहे. परंतु कोजागरीला वाढलेली दुधाची मागणी लक्षात घेता, त्यात भेसळ होण्याची शक्यता वाढली आहे. शहराला दररोज ३ ते ३.५ लाख लिटर दुधाची गरज भासते. परंतु कोजागरीच्या निमित्ताने दुधाची मागणी पाच लाख लिटरहून अधिक असते. दोन लाख लिटर अतिरिक्त दुधाची पूर्तता करण्याकरिता दुधात भेसळ होण्याची शक्यता आहे.उघड्यावर विक्रीशहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध येत असतानाही, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई दिसून येत नाही. शहरात उघड्यावर दूध विकले जात आहे. ते कुठल्या कंपनीचे आहे याची माहिती नाही. त्याचे दरसुद्धा ४० ते ५० रुपये लिटर आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यास प्रशासन असमर्थ दिसत आहे.शिंगाड्याचे पीठ व युरियाचा वापरशहरात दुधाची पूर्तता गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होते. परंतु गोंदियातून येणाºया दुधाच्या बाबतीत नेहमीच साशंकता राहत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात शिंगाड्याचे पीठ व युरियाचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मनसर येथून सुद्धा अशा प्रकारच्या दुधाची शहरात पूर्तता होत असल्याचे बोलले जात आहे.८८ टक्के दुधात भेसळ२७ सप्टेंबर रोजी केंद्रीय अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाचे सदस्याने खुलासा केला होता की, देशात ८८ टक्के दूध भेसळयुक्त व ६८.७ टक्के दूध हे विषारी असते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय दूध मूल्य पॉलिसी बनवावी, असे मत व्यक्त केले होेते.