शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेल होणार सुरू; थेट बांगलादेशपर्यंत जाणार विदर्भातील संत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 09:55 IST

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच त्यांचा माल थेट बांगलादेशमध्ये कमी वेळात पाठविता येणार आहे. विदर्भातून थेट बांगलादेशमध्ये माल नेता यावा यासाठी विशेष ‘किसान रेल’ सुरू करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच त्यांचा माल थेट बांगलादेशमध्ये कमी वेळात पाठविता येणार आहे. विदर्भातून थेट बांगलादेशमध्ये माल नेता यावा यासाठी विशेष ‘किसान रेल’ सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला रेल्वे विभागाने मंजुरी दिली असून त्याचा रोडमॅप तयार करण्यात येईल. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक झाली.विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ मानण्यात येते. दरवर्षी सुमारे अडीच लाख टन संत्री बांगलादेशमध्ये निर्यात करण्यात येतात. विदर्भातून बांगलादेशपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी साधारणत: ७२ तास लागतात. तर रेल्वेमार्गाने हेच अंतर ३६ तासात पार करता येणे शक्य आहे. जर माल लवकर पोहोचला तर त्याची गुणवत्ता कायम राहील व वाहतुकीचा खर्चदेखील कमी होईल, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाला प्रस्ताव सादर केला होता.१२ सप्टेंबर रोजी गडकरी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. संबंधित प्रस्तावाला रेल्वेने हिरवी झेंडी दाखविली असल्याची माहिती सोमेश कुमार यांनी या बैठकीत दिली.२० बोग्यांची राहणार रेल्वेही विशेष रेल्वेगाडी २० बोग्यांची असेल व ४६० टन माल वाहून नेण्याची क्षमता असेल. वरुड, काटोल, नरखेड स्थानकांवरुन शेतकरी आपला माल या गाडीतून पाठवू शकतील. यासाठी विशेष संकेतस्थळ तयार करुन शेतकऱ्यांकडून आधीच बुकिंग घेण्याची सूचना गडकरी यांनी केली.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे