शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

लुटारूंचा जमावावर चाकू हल्ला

By admin | Updated: October 12, 2015 02:47 IST

लुटमार करताना नागरिकांनी रंगेहात पकडल्यामुळे पळून जाण्यासाठी लुटारूंनी जमावातील दोघांवर चाकूहल्ला केला.

दोन आरोपींची बेदम धुलाई : जरीपटक्यातील घटनानागपूर : लुटमार करताना नागरिकांनी रंगेहात पकडल्यामुळे पळून जाण्यासाठी लुटारूंनी जमावातील दोघांवर चाकूहल्ला केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने दोन लुटारूंची बेदम धुलाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. त्यांचा एक साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.मोहम्मद फयीम मोहम्मद उस्मान अन्सारी (वय ३१, रा. कामगार नगर) हे जरीपटक्यातील एचपी पेट्रोल पंपाजवळून शनिवारी रात्री १०.३० ला घरी जात होते. गौतम लक्ष्मण बगारे (वय २८) आणि मोंटू रमेश चंद्रिकापुरे (वय २२, रा. दोन्ही मानकापूर) तसेच त्यांच्या एका साथीदाराने फयीमला रोखले. चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत आरोपींनी फयीमजवळचे ५०० रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. फयीमने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी पकडल्यामुळे लुटारूंनी दोन नागरिकांवर चाकू हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोघांची बेदम धुलाई केली. त्यांना नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. एक आरोपी मात्र पळून गेला. जरीपटका पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)आरोपींच्या हल्ल्यात एक गंभीरहल्लेखोरांनी चाकू व काठीने हल्ला चढवल्यामुळे शुभम अशोक शेंडे (वय २२, रा. जुनी सोमवारी क्वॉर्टर) हा गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री १० च्या सुमारास शुभम आपल्या मित्रांसोबत विमा दवाखाना चौकातील पान टपरीवर उभा असताना चौघांनी त्याला गंभीर जखमी केले. अनिल अशोक शेंडे (वय २८) यांच्या तक्रारीवरून सक्करदराचे एपीआय जी.के. फुलकवर यांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.