शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

आॅटोचालकाचे अपहरण करून हत्या

By admin | Updated: April 18, 2017 01:44 IST

अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात झाले.

मृतदेह विहिरीत फेकला : आठ दिवसांपासून होता बेपत्ता नागपूर : अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात झाले. निकेश विजय साठवणे (वय २५) असे मृताचे नाव असून, नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली. आॅटोचालक असलेला निकेश वाठोड्यातील पवनशक्तीनगर येथे राहत होता. गेल्या ९ एप्रिलपासून बेपत्ता होता. त्याचा ठिकठिकाणी शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याची आई शालू विजय साठवणे (वय ३८) यांनी नंदनवन ठाण्यात ‘मिसिंग‘ची तक्रार नोंदवली. पालक आणि पोलीस निकेशचा शोध घेत असतानाच, काही जणांनी वाठोड्यातीलच गोपाल बिसेनसोबत ९ एप्रिलच्या रात्री निकेश जातना दिसल्याचे सांगितले. ही माहिती निकेशच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी गोपाल आणि त्याची मैत्रीण जया शर्मा यांना रविवारी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. बरीच विचारपूस करूनही आरोपींनी निकेशबाबत कसलीही माहिती असल्याचा इन्कार केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मोकळे केले. मात्र, त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी सोमवारी सकाळी गोपालला पुन्हा ठाण्यात नेले. चौकशीत त्याने निकेशच्या हत्येची कबुली दिली आणि मृतदेह वाठोड्यातील एका विहिरीत फेकल्याचे सांगितले.त्यानंतर गोपालसह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीबाहेर काढला. तो निकेश साठवणेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. मृतदेह रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी निकेशची शस्त्राचे घाव घालून हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला. दोन महिन्यांपूर्वीच्या भांडणाचा सूड आरोपी जया शर्मा हिचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त आहे. तिचे आणि निकेशचे दोन महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधाच्या कारणावरून जोरदार भांडण झाले. त्यामुळे जयाने आरोपी बिसेन आणि त्याच्या एका मित्राला निकेशची हत्या करण्यासाठी उकसवले. तिने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून गोपाल आणि त्याच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या मित्राने ९ एप्रिलच्या रात्री १० वाजता निकेशला त्याच्या घरून बोलवून नेले. त्यानंतर त्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह विहिरीत फेकण्यात आला. हा घटनाक्रम उघड झाल्यानंतर आज रात्री नंदनवनचे पोलीस उपनिरीक्षक जी. ए. गोटके यांनी गोपाल बिसेन, जया शर्मा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध दाखल केला. बिसेनला अटक करण्यात आली. जया घराला कुलूप लावून पळून गेली तर महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला आरोपी दोन दिवसांपासूनच फरार आहे. पोलीस जया आणि त्याचा शोध घेत आहेत.(प्रतिनिधी)