शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५० रुपयांसाठी जीव घेतला अपहरण करून हत्या

By admin | Updated: May 28, 2016 02:56 IST

आरोपींच्या अटकेनंतर अवघ्या ५० रुपयांसाठी पिंटूचे अपहरण आणि हत्या झाल्याचे उघड झाले.

नागपूर : आरोपींच्या अटकेनंतर अवघ्या ५० रुपयांसाठी पिंटूचे अपहरण आणि हत्या झाल्याचे उघड झाले. पिंटू आधी हातठेल्यावर चायनिज विकायचा. नंतर त्याने टाटा मॅजिक वाहन खरेदी केले. त्यामुळे त्याने आपला हातठेला आरोपी इद्रिसला दिला. हा हातठेला इद्रिसला द्यावा म्हणून आरोपी पांडेय आणि शाहू यांनीही आग्रह धरला होता. त्याचा किराया देण्यासाठी मात्र इद्रिस कुरबूर करीत होता. दरम्यान, मालवाहू वाहन खरेदी केल्यानंतर पिंटूला दारूचे व्यसन जडले. त्यामुळे तो आरोपींकडून हातठेल्याच्या किरायाच्या बदल्यात दारूसाठी पैसे मागायचा. ते दिले नाही तर त्याचा आरोपीसोबत वाद व्हायचा. आरोपींनी त्याला दारूचे व्यसन भागविण्यासाठी पैसे दिल्यास नशेत तो हातठेल्याच्या पैश्याचा व्यवहार विसरायचा. असे वारंवार व्हायचे. बुधवारी रात्रीही असेच झाले. पिंटूने आरोपींना दारूसाठी ५० रुपये मागितले. आरोपींनी त्याला नकार दिल्याने एकमेकांना शिवीगाळ, देख लेंगे अशी धमकीही दिली. त्यानंतर पिंटू तेथून निघून गेला. पिंटू चार चौघात शिवीगाळ करतो, धमकी देतो, त्याचे हे नेहमीचेच असल्याने आरोपींनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार, बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सर्व आरोपींनी पिंटूला चिकित्सालयाच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या काठावर नेले. तेथे त्याला दारू पाजली अन् त्याच्या डोक्यावर हातोडा मारून त्याला ठार मारले. त्यानंतर मृतदेह एका पोत्यात भरून तो खड्ड्यात टाकला. वरून काटेरी फांद्या टाकून आरोपी निघून गेले. दोन दिवस झाल्यामुळे आरोपी निर्धास्त झाले होते. मात्र, शुक्रवारी अखेर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या.