समाधानाची बाब म्हणून लसीकरणास सुरुवात झाली असली तरी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो आहे. अशा स्थितीत नागरिकांनी कोरोना नियमाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. मात्र, तरीसुद्धा लोक अशाप्रकारे वागत आहेत, जणू कोरोना संपला. या तीन चित्रांतून प्रगल्भ आणि निरागस असे फरक लक्षात येतात. एका छायाचित्रात निरागस लहान मुलगी मास्क घालून एकटीच खेळत आहे. दुसऱ्या चित्रात कोरोना संदेश लिहिलेल्या भिंतीकडे पाठ दाखवून तिघे वृद्ध विनामास्क बसले आहेत तर तिसऱ्या छायाचित्रात व्यक्तिश: अंतर जपण्याचे आवाहन केले जात असतानाही एकमेकांना खेटून नाश्त्याची चव घेत आहेत. जिथे मुलांना गांभीर्य कळते तिथे प्रगल्भ म्हणवणारे लोक असे का वागतात, हा प्रश्न यामुळे अधोरेखित होतो. मग लॉकडाऊन कशासाठी, असा प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला खरेच आहे का?
मुलांना कळते, तुम्हाला कधी कळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST