शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रक्तगट जुळत नसतानाही होणार ‘किडनी ट्रान्सप्लांट’

By admin | Updated: June 19, 2017 01:58 IST

मूत्रपिंड दाता असतानाही अनेकदा रक्तगट व मूत्रपिंड जुळत (मॅच) नाही, या कारणाखाली रुग्णाला ‘डायलिसिस’वर जीवन जगावे लागते.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पुढाकार : ‘स्वॅप’ व ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल’ पद्धत करणार सुरूसुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूत्रपिंड दाता असतानाही अनेकदा रक्तगट व मूत्रपिंड जुळत (मॅच) नाही, या कारणाखाली रुग्णाला ‘डायलिसिस’वर जीवन जगावे लागते. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना जीवनदान देण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने ‘स्वॅप किडनी ट्रान्सप्लान्ट’(मूत्रपिंड अदलाबदल प्रत्यारोपण) व ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लान्ट’ पद्धत सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाल्यास राज्यातील हे पहिले शासकीय रुग्णालय ठरणार आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील शेकडोहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊनच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र’ सुरू केले. शासकीय रुग्णालयांमधील राज्यातील पहिले केंद्र ठरले आहे. या केंद्रात आतापर्यंत १६ यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे. विशेष म्हणजे, या जून महिन्यापासून आठवड्यातून एकदा म्हणजे, दर बुधवारी किडनी ट्रान्सप्लान्ट करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. नेफ्रालॉजी विभागाचे अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. यामुळे लवकरच सामान्य प्रत्यारोपणासोबतच ‘स्वॅप किडनी ट्रान्सप्लान्ट’ व ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लान्ट’प्रकार सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. अशा रुग्णांची वेगळी यादी तयार केली जात आहे.‘स्वॅप’मुळे मागणी व पुरवठ्यामधील अंतर कमी होणारभारतामध्ये दरवर्षी सुमारे ९० हजार लोकांना मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र, यापैकी केवळ २.५ टक्के रुग्णांना मूत्रपिंड मिळू शकते. जवळचे नातेवाईक मूत्रपिंड दान करू इच्छित असले तरी रक्तगट व किडनी ‘मॅच’ होत नसल्याच्या कारणांमुळे साधारण ७५ टक्के मूत्रपिंडदाते प्रत्यारोपणासाठी अपात्र ठरतात. यावर ‘स्वॅप ट्रान्सप्लान्ट’ उपयोगी पडते. यात जवळचे नातेवाईक दाते आहेत. त्यांची किडनी व रक्तगट मॅच होत नाही. परंतु दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांचे हे दोन्ही मॅच होते, अशा प्रकरणात ‘स्वॅप ट्रान्सप्लान्ट’केले जाते. ‘स्वॅप’ पद्धतीमुळे अवयव मिळाल्यास मागणी आणि पुरवठ्यामधील अंतर कमी होण्याची शक्यता आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत १६ यशस्वी किडनी ट्रान्सप्लान्ट झाले आहेत. लवकरच ‘मॉडर्न आॅपरेशन थिएटर’ उपलब्ध होणार आहे. यामुळे ‘स्वॅप ट्रान्सप्लान्ट’ व ‘एबीओ इनकॉम्पॅटीबल किडनी ट्रान्सप्लान्ट’ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या दिशेने वाटचाल सुरूही केली आहे. यात यश आल्यास रुग्णांना जीवनदान मिळण्याचे प्रमाण वाढेल.-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल असे आहे, ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट’प्रसिद्ध किडनी ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, ज्या रुग्णाकडे जवळचे नातेवाईक डोनर (दाता) एकच आहे, परंतु त्यांचे रक्तगट जुळत नाही, त्यांच्याकरिता ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल’ पद्धतीने किडनी ट्रान्सप्लान्ट करणे शक्य होते. यात विशेष इंजेक्शन व औषधांची मदत घेतली जाते. याला मोठा खर्च येतो.