शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

किडनी ट्रान्सप्लांटचा मुहूर्त कधी ?

By admin | Updated: December 8, 2015 04:14 IST

गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र (किडनी

गेल्या अधिवेशनात केली होती घोषणा : आरोग्य विभागाची उदासीनतासुमेध वाघमारे ल्ल नागपूरनागपूर : गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र (किडनी ट्रान्सप्लांट सेंटर) सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती, तर मेडिकलच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी तीन दिवसांत किडनी ट्रान्सप्लांट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्याची सूचना केली होती. परंतु आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे अद्यापही हे केंद्र सुरूच झाले नाही. विशेष म्हणजे, किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करीत असलेले गरीब रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असलेले नातेवाईक अडचणीत सापडले आहेत.राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील हजाराहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊन राज्यात प्रथमच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याची घोषणा २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात विनोद तावडे यांनी केली होती. तीन महिन्यात हे केंद्र सुरू करा, असे निर्देशही मेडिकल प्रशासनाला दिले होते. परंतु घोषणेच्या सात महिन्यानंतर ४ जुलै २०१५ रोजी झालेल्या अभ्यागत मंडळात हा विषय समोर आला. अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राला घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाला धारेवर धरले. ‘मुहूर्त शोधत आहात का’, असा थेट सवाल करीत तीन दिवसांत प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. परंतु आरोग्य विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंजुरी नसल्याचे कारण पुढे करीत प्रमाणपत्र राखून ठेवले. याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी घेऊन काही दिवसांतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक दस्तऐवज सादर केले. परंतु तब्बल तीन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मंडळाने मंजुरी दिल्याचे मिनिटस् मेडिकलला प्राप्त झाले. सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने हे मिनिटस् आणि प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्याचे पत्र आरोग्य विभागाला पाठविले. परंतु पाच दिवसांचा कालावधी होऊनही प्रमाणपत्राची प्रतीक्षाच आहे. सात टक्के रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतबदलत्या जीवन शैलीमुळे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. शंभरपैकी १० जणांना मूत्रपिंडाचे आजार आहेत. त्यातील सात टक्के लोकांचे मूत्रपिंड अत्यंत खराब झालेले आहे. किडनी निकामी होण्याचे युवकांमधील प्रमाणही गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. मूत्रपिंडाच्या विकाराच्या रुग्णासमोर डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय असतो. यातील प्रभावी उपचारपद्धती प्रत्यारोपण हीच आहे. परंतु खासगी रुग्णालयातील भरमसाठ शुल्कामुळे अनेकांकडे दाते असतानाही ते या शस्त्रक्रियेपासून वंचित आहे.