शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावावर मुलींचे अपहरण

By admin | Updated: July 7, 2016 03:02 IST

एका इव्हेंट कंपनीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसह दोन तरुणींचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली.

व्हेंट कंपनीत नोकरीचे आमिष : आरोपी मुलीही गायबनागपूर : एका इव्हेंट कंपनीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसह दोन तरुणींचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. शांतिनगर येथील १७ आणि १९ वर्षीय मुलीची काजल बाराहाते रा. पाचपावली पोलीस चौकी आणि प्रियंका नावाच्या मुलीशी ओळख आहे. काजल आणि प्रियंकाने पीडित मुलींना चंद्रपुरात एका ‘इव्हेंट’चे काम असल्याचे सांगितले. त्यात काम असल्याचे आमिष दाखविले आणि सोबत चलण्यास सांगितले. बेरोजगार असल्याने दोन्ही मुली तयार झाल्या. त्यांनी घरच्यांनासुद्धा याची माहिती दिली. काजल आणि प्रियंकाने १ जुलैपर्यंत नागपुरात परत येण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे घरचे तयार झाले. २२ जून रोजी काजल व प्रियंकासोबत दोन्ही मुली गेल्या. १ जुलै रोजी मुली परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी काजल व प्रियंकाशी संपर्क साधला. परंतु त्या दोघीही समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाही. कुटुंबीयांनी मुलींसोबत बोलणे करून देण्यास सांगितले. तेव्हा दोघीही कुटुंबीयांना टाळू लागल्या. यानंतर शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच काजल व प्रियंका गायब झाल्या. त्यामुळे यात गुन्हेगारी कृत्य असल्याची शंका बळावली आहे. (प्रतिनिधी)