शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून हत्या

By admin | Updated: May 28, 2016 02:48 IST

पैशाच्या जुन्या व्यवहारातून एका वाहनचालकाचे त्याच्या मित्रांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आली.

सीताबर्डीतील जंगलात आढळला मृतदेह : मित्रांनीच केला मित्राचा घात, चौघे ताब्यातनागपूर : पैशाच्या जुन्या व्यवहारातून एका वाहनचालकाचे त्याच्या मित्रांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आली. प्रमोदकुमार ऊर्फ पिंटू भरतलाल पांडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. तो जयताळ्यातील माऊली मंदिराजवळ राहत होता.पिंटू छोटे मालवाहू वाहन चालवत होता. २५ मे रोजी त्याचा त्याच्या काही मित्रांसोबत वाद झाला. त्यानंतर या मित्रांनी त्याला महाराजबाग मार्गावरील हरीश बारजवळून सोबत नेले. तेव्हापासून तो बेपत्ता होता. दोन दिवसांपासून पिंटू घरी परत आला नाही. त्यामुळे पिंटूचा मोठा भाऊ विनोद भरतलाल पांडे (वय ३०) याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलीस पिंटूचा शोध घेत असतानाच हरीश बारच्या नाल्याजवळून तीव्र दुर्गंध येत असल्याचे काही जणांनी गुरुवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. पोलिसांनी रात्री शोधाशोध सुरू केली. श्वान पथकाला पाचारण केले. गुन्हेशाखेचे पथकही पोहचले. त्यानंतर नाल्याच्या बाजूला (पशू चिकित्सालयाजवळच्या भागात) खड्यात मृतदेह आढळला. पोलिसांनी विनोद पांडेकडून पिंटूच्या मृतदेहाची ओळख पटवून घेतली. मृतदेह पुरता कुजला होता. त्याचा बुधवारी रात्री वाद झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच पिंटूच्या मित्रांची चौकशी सुरू केली. त्यानंतर अजीम कादीर बेग (वय १८, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी, धरमपेठ), हिमांशू सुभाष पांडे (वय १९, रा. श्रीनगर, इंगोले ले-आऊट, मानकापूर) घनश्याम गौतम शाहू (वय १८, रा वसंतराव नाईक झोपडपट्टी, धरमपेठ) आणि अन्य एक अल्पवयीन साथीदार अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.आरोपींची निर्दयता पिंटूची हत्या करणाऱ्या आरोपींनी निर्दयतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्याचा एक हात शरीरापासून वेगळा केला. पोलिसांनी पिंटूचा हात शोधण्यासाठी बरीच धावपळ केली. दरम्यान, या थरारक हत्याकांडाने सीताबर्डीतील वाहनचालक, हातठेलेवाले, छोटे व्यापारी अक्षरश: हादरले आहेत. माहिती कळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत पिंटूला तीन भाऊ असून, तो सर्वात लहान होता. तो विवाहित असून त्याची पत्नी सध्या माहेरी (उत्तर प्रदेशात) गेली असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.