शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

खोब्रागडे यांची मृत्यूशी झुंज संपली

By admin | Updated: May 24, 2014 01:07 IST

गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथे पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय खोब्रागडे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पेट्रोल टाकून जिवंत पेटविल्याचे प्रकरण : मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

नागपूर/गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथे पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय खोब्रागडे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खोब्रागडे यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणला असता विविध आंबेडकरी संघटनांनी जोरदार नारेबाजी केली. खोब्रागडे यांचा मुलगा प्रदीप याने शवविच्छेदनाला लागणार्‍या पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. पोलिसांच्या कस्टडीत असलेली त्याची आई देविकाबाई निर्दोष असून तिनेच पंचनाम्यावर सही करावी, अशी मागणी त्याने आणि संघटनांनी लावून धरल्याने सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील रहिवासी खोब्रागडे यांच्यावर १६ मे रोजी मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून दिले. शनिवारी सायंकाळी खोब्रागडे यांना अत्यवस्थ अवस्थेत मेडिकलमध्ये आणले. वॉर्ड क्रमांक १९ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. ९४ टक्के जळालेल्या खोब्रागडेंचे पाय सोडून सर्वांग जळाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना दुसर्‍याच दिवशी वॉर्ड क्र. ४ मध्ये हलविण्यात आले. शर्तीचे उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह मेडिकलच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला. यावेळी विविध आंबेडकरी सामाजिक संघटनांनी शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. त्यांच्या मते पोलीस करीत असलेला तपास चुकीचा आहे. शासनाने पोलिसांकडून हा तपास काढून सीबीआयकडे सोपवावा, तसेच शवविच्छेदनाकरिता पोलिसांच्या पंचनाम्यावर देविकाबाईच स्वाक्षरी करेल, अशी या मागणीला करीत त्यांचा मुलगा व संघटनेचे कार्यकर्ते अडून बसले होते. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्यावर स्वाक्षरी झालेली नव्हती. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय किंवा विशेष पथकाकडून चौकशी करावी अशी मागणी करीत आंबेडकरी संघटनांनी ‘गोंदिया शहर बंद’चे आवाहन केले होते. यासाठी दिवसभर कार्यकर्ते गटागटांनी शहराच्या व्यापार लाईनमध्ये घोषणा देत फिरत होते. तहसील कार्यालयासमोर धरणेही देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. खोब्रागडे यांना त्यांची पत्नी व तिच्या प्रियकराने जाळल्याचा पोलीस केवळ देखावा करीत असून यात आधी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना वाचविण्यासाठीच पोलिसांनी या प्रकरणाला वळण दिल्याचा आरोप आंबेडकरवादी संघटनांंनी केला. (प्रतिनिधी)