शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

४४,८०० हेक्टरमध्ये खरीप पिकांचे नियाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ खरीप हंगामासाठी एकूण ४४,८०० हेक्टर क्षेत्रात पीक लागवडीचे नियाेजन करण्यात आले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ खरीप हंगामासाठी एकूण ४४,८०० हेक्टर क्षेत्रात पीक लागवडीचे नियाेजन करण्यात आले असून, यात साेयाबीन, धान, कपाशी व तूर पिकाचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी विविध माेहीम व याेजनांच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

तालुक्यात २०२१-२२ खरीप हंगामाकरिता कपाशी पिकाचे क्षेत्र १७ हजार हेक्टर, साेयाबीन १५ हजार हेक्टर, तूर सलग व बांधावर मिळून २,६०० हेक्टर क्षेत्राचे नियाेजन करण्यात आले आहे. तालुका कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी सेवक गावागावांत भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शेतकऱ्यांनी साेयाबीन बियाणांची उगवणक्षमता तपासणी करूनच पेरणी करावी. रासायनिक व जैविक बुरशीनाशके व जिवाणू खते यांची बीजप्रक्रिया करून पुढे येणाऱ्या राेग व किडीपासून पिकाचे संरक्षण करावे. साेयाबीन पिकाची रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी किंवा पट्टा पद्धतीने लागवड करावी. जेणेकरून हेक्टरी साडेचार लाख झाडांची संख्या राहील. साेयाबीन पीक दाेन ते चार पानावर असताना पहिली फवारणी निंबाेळी अर्काची करून खाेडमाशी व चक्रीभुंगा यापासून बचाव करता येईल. तसेच कपाशी हे महत्त्वाचे पीक असून, या पिकाची पूर्वहंगामी लागवड करणे टाळावे. कपाशीची लागवड १०० टक्के रुंद सरी वरंबा पद्धतीने हाेणे अपेक्षित आहे. सापळा पिकाची लागवड (चवळी, मका, ज्वारी) तसेच हिरवळीचे खत बाेरूची आंतरपिकाप्रमाणे लागवड करून ४५ दिवसांनी जमिनीत गाडावे. जेणेकरून पिकाच्या रासायनिक खतावरील खर्चात बचत हाेऊन, तणाचे प्रभावीपणे व्यवस्थापन हाेऊ शकेल. कपाशी पिकावर पहिल्या दाेन फवारण्या या निंबाेळी अर्काच्या कराव्या व फरदड पीक घेऊ नये, असे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांनी केले.

...

कृषी मार्गदर्शन कक्ष स्थापन

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांची माहिती मिळावी, यासाठी गावांमध्ये कृषी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीअंतर्गत ‘ग्राम कृषी विकास समिती’ तयार करण्याचे काम सुरू आहे. या समितीच्या माध्यमातून कृषिक्षेत्राशी संबंधित समस्यांचे निवारण हाेऊन ग्रामस्तरावर नियाेजन करण्यास मदत हाेईल. तसेच शेतकरी गटांमार्फत बांधावर खते या संकल्पनेनुसार तालुक्यात दाेन गटांनी ७.५ मेट्रिक टन खताची उचल केली असून, शेतकऱ्यांनी कृषिसेवा केंद्रात गर्दी न करता शेतकरी गटांमार्फत खते खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.