शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘खड्डे’पुराण कधी संपेल ?

By admin | Updated: August 4, 2016 02:08 IST

शहरातील उखडलेल्या रस्त्यासंदर्भात नागरिकांत प्रचंड असंतोष असल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चौकशी समिती

आता होणार झोननिहाय पाहणी : १४ दिवसानंतर मिळाला चौकशी ‘मार्ग’ नागपूर : शहरातील उखडलेल्या रस्त्यासंदर्भात नागरिकांत प्रचंड असंतोष असल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु घोषणा झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी बुधवारी स्थापत्य समितीच्या बैठकीत चौकशीची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यात दररोज एका झोनमधील रस्त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चौकशी समितीच्या सदस्यांनी झोनमधील उखडलेल्या रस्त्यांची पाहणी के ल्यानंतर याबाबतचा अहवाल तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी समितीचे सभापती सुनील अग्रवाल, मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. कालावधी कमी असल्याने पहिल्या टप्प्यात झोनमधील मुख्य रस्त्यांची पाहणी क रण्यात येईल. अंतर्गत रस्त्यांच्या चौकशीविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पाहणीचे काही निकष ठरविण्यात आले आहेत. परंतु याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. २० जुलैला सर्वसाधारण सभेत महापौर प्रवीण दटके यांनी उखडलेल्या रस्त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वपक्षीय समिती गठित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार समितीने १५ दिवसांत आयुक्तांना अहवाल सादर करणे अपेक्षित होते. परंतु समितीला चौकशीची रूपरेषा ठरविण्यासाठी १४ दिवस लागले. पुढील सर्वसाधारण सभेपूर्वी चौकशी अहवाल सादर करावयाचा असल्याने समितीकडे मोजकाच कालावधी शिल्लक असल्याने अंतर्गत रस्त्यांची चौकशी तूर्त शक्य नसल्याचे समितीच्या एका सदस्याने सांगितले. लक्ष्मीनगर झोनपासून चौकशीला सुरुवात करण्यात येईल. यात दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी ग्वाही समितीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी दिली.(प्रतिनिधी) राष्ट्रवादी-शिवसेना गप्प समितीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सदस्यांचा समावेश करण्याचे निर्देश दटके यांनी दिले होते. परंतु अद्याप या पक्षाच्या सदस्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. परंतु दोन्ही पक्षाचे नगरसेवक यासंदर्भात गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.