शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केरळचा कळवळा, विदर्भातील शेतकºयांबाबत मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:53 IST

शालेय पुस्तकांमध्ये ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’ ही म्हण अनेकदा वाचनात येते.

ठळक मुद्देभाजप नेत्यांचे असेही समाजकारण : भाजपच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय पुस्तकांमध्ये ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’ ही म्हण अनेकदा वाचनात येते. मात्र राजकीय पटलावर ही म्हण कशी चपखलपणे बसते हे भाजपच्या शहर कार्यकारिणीतील नेत्यांनी दाखवून दिले. विदर्भात अपुºया पावसामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजाचे मनोबल कीटकनाशकांच्या फवारणीने झालेल्या शेतकरी मृत्यूंमुळे ढासळले आहे. शेतकºयांच्या या परिस्थितीबाबत मौन बाळगून असलेल्या भाजपच्या नेत्यांना हजारो किलोमीटर दूर असलेल्या केरळमधील भाजप कार्यकर्त्यांचा कळवळा आला. तेथील हत्यांचा निषेध करीत असताना आपल्या मातीतील शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना रस्त्यावर का उतरावेसे वाटले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. संघाने यासंदर्भात कधी नव्हे ती उघडपणे भूमिका घेतली. भाजपतर्फे केरळात जनरक्षा यात्रेची मोहीम राबविण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील याला उपस्थित होते. उपराजधानीपासून १५०० किलोमीटर अंतरावर केरळमधील सत्ताधाºयांकडून होणाºया या राजकीय हिंसेचा निषेध करण्यासाठी व जनरक्षा यात्रेच्या समर्थनार्थ शहर भाजपतर्फे सोमवारी दुपारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, महामंत्री संदीप जोशी, किशोर पलांदूरकर, संदीप जाधव, प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता, श्रीकांत देशपांडे, संजय बंगाले, धर्मपाल मेश्राम, इत्यादी नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. केरळ सरकारविरोधात यावेळी जोरजोराने नारे लावण्यात आले व जर हत्या थांबल्या नाहीत तर नागपुरातील भाजप कार्यकर्ते केरळमध्ये जाऊन शासनाला प्रत्युत्तर देतील, असे दावेदेखील करण्यात आले. हजारो किलोमीटरवर सुरू असलेल्या हिंसेला नागपुरातून जाऊन उत्तर देण्याची भाषा करणाºया नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचा मात्र विसर पडला होता. कीटकनाशकांच्या फवारणीने यवतमाळमध्ये झालेल्या जीवघेण्या घटनांचे लोण नागपूर जिल्ह्यातदेखील पसरले. जिल्ह्यातदेखील काही शेतकरी यामुळे आजारी पडले आहेत. सोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुºया पावसामुळे शेतकºयांना फटका बसला आहे. मात्र नागपूर शहरातील एकाही आमदाराने यासंदर्भात सरकारकडे मागणी केलेली नाही. इतकेच काय तर शेतकºयांच्या मृत्यूसंदर्भात सांत्वना देणारे साधे पत्रदेखील काढलेले नाही.विदर्भातील शेतकºयांच्या मुद्यावर नेत्यांनी मौन बाळगल्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्तेदेखील अस्वस्थ झाले आहे. पक्षाने याबाबत पुढाकार घ्यायला हवा होता, असे मत एका पदाधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. दुसरीकडे संविधान चौकात जनसामान्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. केरळमधील हिंसा निषेधार्हच आहे. मात्र तेथील कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असताना भाजप नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचे अश्रू दिसले नाहीत का, असे प्रश्न संविधान चौकात उपस्थित असलेल्या जनसामान्यांमधूनच उपस्थित झाले. यासंदर्भात शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.