शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी फाशीवरील निर्णय राखून

By admin | Updated: September 30, 2015 06:49 IST

दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची

नागपूर : दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सादर केले आहे. तसेच, मेश्रामने त्याच्या शिक्षेविरुद्ध अपील केले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंगळवारी या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. आरोपी हा संबंधित मुलीचा चुलत मामा असून तो झटाळा ता. घाटंजी येथील रहिवासी आहे. गेल्या १४ आॅगस्ट रोजी यवतमाळ सत्र न्यायालयाने आरोपीला दुहेरी फाशी व दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीने हे माणुसकी व नात्याला काळीमा फासणारे कुकृत्य केले. त्या दिवशी संबंधित मुलीचे आई-वडील तिला गावातच राहणाऱ्या आजोबाकडे ठेवून मंदिरात महाप्रसादासाठी गेले होते. दरम्यान, शत्रुघ्न तिला आई-बाबा घरी आल्याचे सांगून सोबत घेऊन गेला. अर्ध्या तासाने आजोबा तिच्या घरी गेले असता ती घरी आली नसल्याचे कळले. जवळपास विचारपूस केली असता शत्रुघ्न तिला घेऊन अंगणवाडीकडे गेल्याचे समजले. वडील व आजोबाने अंगणवाडी गाठली असता तेथे ही चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. शत्रुघ्न तिच्या बाजूला पडलेला होता. चिमुकलीला बेशुद्धावस्थेत कुर्लीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पारवा पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, खून व लंैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. १२ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने वडील, आजोबा, डॉक्टर यांच्यासह १४ साक्षीदार तपासले. उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. टी.जी. बनसोड तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व अतिरिक्त सरकारी वकील मेहरोज पठाण यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)