शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

सफाई कर्मचाऱ्यांसाठी वस्तीत नोंदणी रजिस्टर ठेवा :पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:21 IST

जीपीएस घड्याळ उपलब्ध केल्यानंतरही सफाई कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियुक्ती असलेल्या वस्त्यांत सफाई कर्मचाऱ्यांनी काम करावे, यासाठी वस्तीत महापालिकेने प्रमाणित केलेली नोंदवही ठेवावी. संबंधित वस्तीतील नागरिकांची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतरच वस्तीच्या सफाईची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन द्या, हा निर्णय संपूर्ण शहरासाठी लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जनसंवाद कार्यक्रमात प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देलक्ष्मीनगर झोन जनसंवाद कार्यक्रममोकाट कुत्री, डुकरांमुळे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीपीएस घड्याळ उपलब्ध केल्यानंतरही सफाई कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियुक्ती असलेल्या वस्त्यांत सफाई कर्मचाऱ्यांनी काम करावे, यासाठी वस्तीत महापालिकेने प्रमाणित केलेली नोंदवही ठेवावी. संबंधित वस्तीतील नागरिकांची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतरच वस्तीच्या सफाईची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन द्या, हा निर्णय संपूर्ण शहरासाठी लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जनसंवाद कार्यक्रमात प्रशासनाला दिले.लक्ष्मीनगर झोनच्या दरबारात नागरिकांच्या सफाईबाबत आलेल्या प्रचंड तक्रारीनंतर हा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, सभापती प्रकाश भोयर, ज्येष्ठ नेते राजीव हडप, अग्निशमन समिती सभापती लहुकुमार बेहते, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडू, पल्लवी श्यामकुळे, मीनाक्षी तेलगोटे, लक्ष्मी यादव, वनिता दांडेकर, नगरसेवक लखन येरवार, किशोर वानखेडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.सफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही, तक्रारी करूनही कारवाई होत नाही अशा तक्रारी टाकळी सिम, जयताळा व अन्य अनेक भागातून नागरिकांनी यावेळी केल्या. राजेश तुरकर या नागरिकाने नाल्यातील घाण पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. सफाई कर्मचाऱ्याला सूचना दिल्यानंतरही ते येत नाही. जयताळा भागातील कचरा उचलला जात नाही. खुल्या भूखंडांवर लोक कचरा फेकतात, स्वच्छता निरीक्षकांना माहीत असूनही त्यावर कारवाई होत नाही. स्वच्छता निरीक्षक कधीच वस्तीत येऊन पाहत नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या भरवशावर झोनचे कामकाज चालत असल्याकडे नागरिकांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.तक्रारकर्ते नागरिक आणि अधिकारी यांच्या समोरासमोर तक्रारींचा निपटारा पालकमंत्री करीत असताना, अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईला अनेकदा नागरिकांनी खोटे ठरविले. यावर पालकमंत्र्यांनी खोटी माहिती दिली तर वेतनात कपात करण्याची तंबी दिली. साफसफाईनंतर अतिक्रमणाच्या तक्रारी मोठ्या संख्येत आल्या.या जनसंवाद कार्यक्रमात ४० तक्रारी आल्या होत्या. जनसंवाद कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत बऱ्याच तक्रारी अधिकाऱ्यांनी सोडवल्या होत्या. कारवाई केल्याचे आढळून आले. याशिवाय शहरातील विद्युत व्यवस्था नसलेल्या ठिकाणी त्वरित विद्युत दिवे लावणे, सिवर लाईन, ग्रीन जिम याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जनसंवादमध्ये निर्णय न होऊ शकलेल्या समस्यांबाबत संबंधित विभागांसोबत बैठक बोलावून तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.भंगार वाहनावर कार्यवाही करापरफेक्ट सोसायटीमध्ये पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या तक्रारीवर दखल घेत ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्वरित कारवाई करा, लक्ष्मीनगर परिसरात अनेक वर्षांपासून बंदावस्थेतील वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. यासंबंधी वाहतूक पोलीस विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले.डुकरे व मोकाट कुत्र्यांचा त्रासजयताळा, खामला तसेच सोनेगाव येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील सोसायटीमध्ये कुत्रे व डुकरांचा त्रास होत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. या भागातील नागरिकांचीही अशीच तक्रार होती. संपूर्ण शहरात ही समस्या असून डुक्कर पकडणे व कुत्र्यांच्या नसबंदीसंबंधी कंत्राट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्वरित यासंबंधी कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. डुकरे पकडण्याचे कंत्राट दिले आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच मोकाट कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया गुरुवारपासून सुरु होणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.पुस्तक विक्रेत्यांचा प्रश्न निकाली काढणारदीक्षाभूमीच्या मुख्य द्वारापुढे महापुरुषांची पुस्तके व इतर साहित्य विक्री करणाऱ्यांना स्थायी स्वरूपाची जागा देण्याची मागणी संबंधित दुकानदारांनी केली. दीक्षाभूमी विकासाचा १०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शासनाकडून ४० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. यामध्ये विक्रेत्यांना जागा उपलब्ध करता येईल का, यासाठी १८ डिसेंबरला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.अतिक्रमणामुळे रस्ता झाला अरुंदअतिक्रमणामुळे परसोडी क्षेत्रातील रस्ता अरुंद झाला असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून रस्ता मोकळा करण्याबाबत येत्या १५ दिवसात कारवाई करा. याशिवाय परिसरात विद्युत व्यवस्थेबाबत त्वरित कार्यवाही करणे व रस्त्याच्या बांधकामासंबंधी १५ दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अडथळे दूर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

 

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीcivic issueनागरी समस्या