शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकांपासून लांब ठेवा

By admin | Updated: January 31, 2017 03:03 IST

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा नागपूर हा गृह जिल्हा असल्यामुळे येथे होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या

हायकोर्टात याचिका : राज्याचे मुख्य सचिवांसह इतरांना नोटीस नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा नागपूर हा गृह जिल्हा असल्यामुळे येथे होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवण्यात यावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. सतीश उके असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी सोमवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव, भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, नागपूर विभागीय आयुक्त व नागपूर जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. कुर्वे यांनी नागपुरातील विविध शाळांमध्ये व विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यामुळे नागपूर हा त्यांचा गृह जिल्हा ठरतो. ‘यूपीएससी’द्वारे निवड झाल्यानंतर त्यांना उत्तराखंड येथे नियुक्ती देण्यात आली होती. १७ डिसेंबर २०१४ रोजी ते पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले. २० मे २०१५ रोजी त्यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी शिक्षक मतदार संघासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुर्वे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कुर्वे यांच्यावर विविध गंभीर आरोप आहेत. त्यांचा इतिहास पाहता निवडणुका पारदर्शी होण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, १६ व १७ जानेवारी रोजी याचिकाकर्त्याने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कुर्वे यांची बदली करण्याची मागणी केली होती, पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना निवेदन सादर करण्यात आले. त्याचाही काहीच फायदा झाला नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)