शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर केदारांनी कमावले ६ ते ७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:19 IST

कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले. 

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले. 

सरकारी कर्जरोख्यांचे व्यवहार कसे होतात?सरकारी कर्जरोखे हे कमी व्याज मिळणारे व दीर्घ मुदतीचे गुंतवणूक रोखे असतात. बँकांनी तरलता निधीची (एसएलआर) पूर्तता समजली जाते म्हणून बँका हे रोखे विकत घेत असतात. हे रोखे विकत घेण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेला पैसे देतात व रिझर्व्ह बँक त्या रोख्यांची नोंद बँकेच्या नावाने कान्स्टिट्यूअ‍ेंट सब्सिडिअरी जनरल लेजर (सीएसजीएल) या रजिस्टरमध्ये करते. हा संपूर्ण व्यवहार डीमॅट स्वरूपात असल्याने बँकेच्या अध्यक्ष वा अधिकाऱ्यांना यात पैशाची अफरातफर करता येत नाही.केदारांनी सीएसजीएल डावललेसुनील केदार यांना बँकेचा पैसा वापरून स्वत:चे खिसे भरायचे असल्याने, त्यांनी सरकारी कर्जरोखे सीएसजीएलमार्फत खरेदी न करता दलालांमार्फत खरेदी करणे सुरू केले. यात फायदा असा होता की, बँकेच्या पैशावर दलाल शेअर बाजारातून सरकारी कर्जरोखे प्रत्यक्ष स्वरूपात खरेदी करत. स्वस्तात घेतलेले हे रोखे अधिक किमतीला विकून दलाल व सुनील केदार नफा कमवत असत. अशाप्रकारे दोन ते तीनवेळा बँकेच्या पैशावर नफा कमवून झाला की मग दलाल रोखे बँकेत जमा करत असत.संपूर्ण २००१ व २००२ असे दोन वर्ष सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरत होते. २००१ साली बँकेला या व्यवहारात पाच कोटी नफा झाला, तर २००२ साली २० कोटी नफा झाला. यापैकी सहा ते सात कोटी केदारांच्या खिशात गेल्याचा अंदाज आहे.कर्जरोख्यांच्या या गोरखधंद्यात सुनील केदार इतके गाफील झाले होते की बँकेला रोखे मिळाले किंवा नाही, हे ते तपासूनही बघत नव्हते.सुनील केदार बीएस्सी (कृषी) व एमबीए शिकलेले आहेत. त्यांच्या याच फाजील आत्मविश्वासाचा फायदा दलालांनी रोखे बँकेला देण्यात टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे जानेवारी/फेब्रुवारी २००२ मध्ये दिलेल्या १५० कोटींचे रोखे बँकेला एप्रिल २००२ मध्येही मिळाले नव्हते व त्याबद्दल केदार पूर्णत: गाफील होते. शेवटी बँकेला १५० कोटींचे कर्जरोखे मिळालेच नाही व केदारांवर जेलयात्रा करण्याची वेळ आली. पण एवढे होऊनही केदार मात्र निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखे दर विधानसभा निवडणुकीत उभे राहत आहेत व सावनेरची आमदारकी उपभोगत आहेत.

टॅग्स :MONEYपैसा